Breaking

बुधवार, २३ फेब्रुवारी, २०२२

जि. प. प्रा. शाळा वसंतनगर नळदुर्ग शाळेत विद्यार्थ्यांना तांदूळ व धान्यादी मालाचे वाटप


जि. प. प्रा. शाळा वसंतनगर नळदुर्ग शाळेत विद्यार्थ्यांना तांदूळ व धान्यादी मालाचे वाटप 

   

 प्रतिनिधी:- अजित चव्हाण



नळदुर्ग:- जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वसंतनगर नळदुर्ग या शाळेत आज दिनांक 23/2/2022 रोजी इ. 1ली ते 5वी च्या विद्यार्थ्यांना माहे ऑगष्ट 2021 ते फेब्रुवारी 2022 या 154 दिवसाच्या कालावधीचा शालेय पोषण आहार अंतर्गत तांदूळ व धान्यादी मालाचे वाटप शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री रवि माणिक राठोड,उपाध्यक्षा सौ.रेश्मा राठोड  व सदस्य सौ.ज्योती पवार,मुख्याध्यापक श्री.आर.आय.औसेकर यांच्या उपस्थितीत करण्यात आले.शालेय पोषण वाटप करण्यास   शाळेतील शिक्षक श्री.ई.एम.शिरगुरे,श्री.एच.एम.सुरवसे,श्रीमती व्ही.एल.वाघमारे,तसेच शा.पो.आ.कर्मचारी सौ. सविता चव्हाण,बबलू चव्हाण इ.नी सहकार्य केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा