“बालकाचे अपहरन करणाऱ्या बारामती तालुक्यातील तरुणास ८ वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा”
प्रतिनिधी :- रूपेश डोलारे उस्मानाबाद.
कळंब पोलीस ठाणे : भीक मागण्याच्या उद्देशाने कळंब तालुक्यातील एका बालकाचे अपहरन केल्याबद्दल लिमटेक, ता. बारामती, जि. पुणे येथील महादेव जनार्धन टिंगरे, वय 59 वर्षे यांच्याविरुध्द क्र. 320 / 2019 हा गुन्हा नोंदवण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास तत्कालीन सपोनि- ए.डी. पवार यांनी करुन उस्मानाबाद सत्र न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले होते. या सत्र खटला क्र. 41 / 2020 ची सुनावणी अति. सत्र न्यायाधीश क्र.2 श्री. व्ही.जी. मोहिते यांच्या न्यायालयात होउन आज दि. 03.02.2022 रोजी निकाल जाहिर झाला.
यात आरोपी- महादेव यास भा.दं.सं. कलम- 363 च्या उल्लंघनाबद्दल 3 वर्षे सश्रम कारावासासह 3,000 ₹ दंडाची तर भा.दं.सं. कलम- 363 (अ) (1) च्या उल्लंघनाबद्दल 5 वर्षे सश्रम कारावासासह 8,000 ₹ दंड व दंड न भरल्यास अतिरिक्त तीन महिने साध्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा