Breaking

गुरुवार, ३ फेब्रुवारी, २०२२

लैंगीक अत्याचार प्रकरणी आरोपीस 7 वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा”


लैंगीक अत्याचार प्रकरणी आरोपीस 7 वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा”

प्रतिनिधी :- रुपेश डोलारे उस्मानाबाद.



भुम पोलीस ठाणे : भूम तालूक्यातील एका खेडेगावातील एक महिला दि. 22.09.2015 रोजी सकाळी शेतात शौचास गेली असता तीच्या मागावर असलेल्या शेजारील गावच्या अंगद नागरगोजे याने तीच्यावर लैंगीक अत्याचार केला होता. याबाबत त्या महिलेच्या प्रथम खबरेवरुन नोंदवण्यात आलेल्या क्र. 105/ 2015 या गुन्ह्याचा तपास तत्कालीन पोलीस निरीक्षक- श्री. रणजीत सावंत यांनी करुन भुम सत्र न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले होते. या सत्र खटला क्र. 58 / 2015 ची सुनावणी अति. सत्र न्यायाधीश श्री. जे.डी. वडणे यांच्या न्यायालयात होउन काल दि. 02.02.2022 रोजी निकाल जाहिर झाला.

            यात आरोपी- अंगद यास भा.दं.सं. कलम- 376 (1) च्या उल्लंघनाबद्दल 7 वर्षे सश्रम कारावासासह 25,000 ₹ दंडाची शिक्षा सुनावली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा