भारताला सुवर्णपदक मिळवून देणा-या प्रणिताच्या घरी तहसीलदारांनी दिली भेट
प्रतिनिधी:- अजित चव्हाण
नळदुर्ग:- भारताला आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेत सुवर्णपदक मिळवून देणाऱ्या रामतीर्थ ता.तुळजापूर येथील प्रणिता मोहन पवार हिच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ ' अशा बातम्या नुकत्याच कांही वर्तमानपत्रांतून प्रसिद्ध झाल्या . याची तातडीने दखल घेवुन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष प्रशांत नवगिरे यांनी हि बाब मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांना कळवून त्यांच्या आदेशानुसार प्रणिता व कुटुंबियांची तिच्या राहत्या घरी मनसेच्या पदाधिकार्यांसह भेट देवुन तिला व तिच्या कुटुंबियांना मदत देवून प्रणिताच्या पुढील कराटे प्रशिक्षण व संपूर्ण शैक्षणिक खर्चाची जबाबदारी घेतली. यावेळी मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांनी प्रणिताशी फोनवरून बोलताना बाळा, मी तुझ्या पाठिशी असुन, तु यापुढे कसलीही काळजी न करता शिकत रहा. तुला कशाचीही कमी पडु दिली जाणार नाही. असे म्हणाले, ही घटना संपूर्ण महाराष्ट्रभर सर्वच वर्तमानपत्रांतुन व सोशल मिडीयाद्वारे वाऱ्यासारखी पसरली. याची गंभीर दखल घेवुन उस्मानाबाद जिल्हयाचे पालकमंत्री आणि जिल्हाधिकारी यांच्या सूचनेनुसार, आज दि. ४ मार्च रोजी तुळजापूर तहसिलदार सौदागर तांदळे यांनी प्रणिताची व कुटुंबियांची त्यांच्या घरी रामतीर्थ येथे भेट घेवून, या संपूर्ण कुटुंबाला मिशन वात्सल्य, संजय गांधी निराधार योजना, घरकुल योजना, यांसह शासनाच्या विविध योजनांचा लाभ तात्काळ मिळवून देवु. कोणत्याही परिस्थितीत या कुटुंबियांशी प्रशासन सोबत असेल . आपण शिक्षणाधिकारी व जिल्हा क्रिडा अधिकारी यांच्याशी संपर्क साधून प्रणिताच्या सर्व अडचणीं बाबत चर्चा करून त्या तात्काळ सोडवुन मदत मिळणेबाबत प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.
यावेळी मनसे जिल्हाध्यक्ष प्रशांत नवगिरे, सरपंच बालाजी राठोड, लक्ष्मण राठोड, गुरुदेव राठोड, पत्रकार सतिश पिसे, सतिश राठोड, ग्रामसेवक अनिल पाटील, मंडळ अधिकारी जयंत गायकवाड, तलाठी तुकाराम कदम, मनसे जिल्हासचिव जोतिबा येडगे, नळदुर्ग शहरसचिव प्रमोद कुलकर्णी, रामु चव्हाण, बाबु राठोड यांचेसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रणिताला न्याय मिळवून देण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष प्रशांत नवगिरे यांनी मोठे प्रयत्न केले. तसेच मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांनी प्रणिता व कुटुंबियांना धीर देवून पाठिशी उभे राहिले.सरपंच बालाजी राठोड, रामतीर्थ
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा