Breaking

रविवार, १ मे, २०२२

माळेगाव सोसायटीच्या चेअरमन पदी वासुदेव गायकवाड तर व्हा चेअरमन पदी सतिश गायकवाड



माळेगाव सोसायटीच्या चेअरमन पदी वासुदेव गायकवाड तर व्हा चेअरमन पदी सतिश गायकवाड 



बेंबळे प्रतिनिधी: 

             माढा तालुक्यातील माळेगाव विविध कार्यकारी सह सेवा सोसायटीच्या नुकत्याच पार पडलेल्या सोसायटीच्या निवडणूकीमध्ये शिवसेना नेते संजय कोकाटे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व १३ सदस्य बिनविरोध निवडून आले होते. या पार्श्वभूमीवर माळेगाव सोसायटीच्या चेअरमन व व्हा.चेअरमन यांच्या निवडीचा कार्यक्रम दि.२३ एप्रिल रोजी पार पडला. यावेळी चेअरमनपदी वासुदेव गायकवाड तर व्हा. चेअरमनपदी सतिश गायकवाड यांची निवड झाली आहे. 
यावेळी संचालक संजय कोकाटे, नारायण नरसाळे,  विठ्ठल गायकवाड, संजय लोकरे, शशिकांत गोसावी,  नागनाथ सुरवसे,  ,दयानंद पाटील, जनाबाई पाटील, शोभा गायकवाड, सहदेव कांबळे, सुरेखा वाघमोडे तसेच सरपंच भागवत कोकाटे, तुकाराम गायकवाड, अरूण गायकवाड, सुदर्शन गायकवाड यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सदरप्रसंगी शिवसेना नेते संजय कोकाटे यांनी नूतन चेअरमन व व्हा चेअरमन यांचे अभिनंदन  करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा