*तेलंगणात जन्मलेला अस्सल*
*महाराष्ट्रीयन माणूस राम रेड्डी -राजा माने
टेंभुर्णी प्रतिनिधी. AJ24Taas News मो.9921581001
महाराष्ट्र आपला हिरक महोत्सव साजरा करीत असताना तेलंगणात जन्मलेले पण तीस वर्षांत सोलापुरातील वास्तव्यात अस्सल महाराष्ट्रीयन बनून मराठी मातीशी एकरुप झालेले उद्योगपती राम रेड्डी ! ते आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या बालाजी अमाईन्स या कंपनीचे तसेच सोलापूर येथील बालाजी सरोवर या तारांकित हॉटेलचे सर्वेसर्वा आहेत. पर्यावरण, जलसंधारण, ग्रामविकास चळवळीत सदैव अग्रेसर असणाऱ्या राम रेड्डी यांच्या कंपनीने कोरोना संकटकाळात रेमडीसीवर इंजेक्शनच्या घटक पदार्थांच्या निर्मितीत बजावलेल्या कामगिरीची जगभरात वाहवा झाली होती.माझ्या "ज्यांनी आभाळ कवेत घेतलं.." या पुस्तकात राम रेड्डी यांचा समावेश आहे. महाराष्ट्राच्या ह
हिरक मोहत्सव निमित्ताने आज महाराष्ट्र दिन चित्रकार नितीन खिलारे यांनी रेखाटलेले आकर्षक व्यक्तिचित्र व पुस्तक सोलापूर तरुण भारत मिडिया लि.चे संचालक प्रशांत बडवे व सोलापूर तरुण भारतचे संपादक विजयकुमार पिसे यांच्या हस्ते रेड्डी यांना प्रदान करुन त्यांचा सत्कार करण्यात आला. मी व प्रशांत बडवे यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी चित्रकार नितीन खिलारे व सोलापूर तरुण भारतचे जिल्हा ग्रामीण आवृत्ती प्रमुख अविनाश गायकवाड हे उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा