*बहुजन रयत परिषदेचे संस्थापक अध्यक्ष प्रा, लक्ष्मणराव ढोबळे साहेब यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमाने साजरा करावा असे पदाधिकाऱ्यांना आवाहन*
प्रतिनिधी रूपेश डोलारे उस्मानाबाद
बहुजन रयत परिषदेचे संस्थापक आदरणीय प्राध्यापक लक्ष्मणराव ढोबळे साहेब यांचा वाढदिवस येत्या १८, मे २०२२, रोजी आहे, साहेबांचे विचार आचार व संस्कार डोळ्यासमोर ठेवून अनाठायी व व्यर्थ खर्च न करता, गोरगरीब, दीनदुबळे, दलित, समाजातल्या होतकरू कष्टाळू गरीब विद्यार्थ्यांकरिता व समाज प्रबोधनात्मक उपक्रमाचे आयोजन करावे, वाढती महागाई व महागडी शिक्षण पद्धतीमुळे समाज मोठ्या कष्टातून दैनंदिन जीवन जगण्याचा प्रयत्न करीत आहे,
लॉकडाउनच्या जीवघेण्या काळात आदरणीय प्राध्यापक लक्ष्मणराव ढोबळे साहेबांनी दोन महिने महाराष्ट्र दौरा केला, तो केवळ माझा समाज कुठल्या अवस्थेत आहे,आणि बहुजन रयत परिषद त्यांच्या साठी काय करू शकते, याचा आढावा घेण्यासाठी आणि म्हणून केवळ वाढदिवस डी,जे लावून जल्लोषात साजरा करण्यापेक्षा, माझ्या समाजातल्या प्रत्येक घटकाच्या अडीअडचणी सोडविण्याचा प्रयत्न करावा,अशी कळकळीची विनंती आदरणीय प्राध्यापक लक्ष्मणराव ढोबळे साहेबांनी संघटनेच्या कार्यकारणीला व पदाधिकाऱ्यांना केलेली आहे, तरी सर्व कार्यकारणी व पदाधिकाऱ्यांनी याची नोंद घेऊन योग्य ती उपक्रम राबवण्याचे आयोजन करावे, असे आवाहन बहुजन रयत परिषद महाराष्ट्र राज्य प्रदेश उपाध्यक्ष श्री,सुरेश श्रीमंत पाटू यांनी केले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा