बबनरावजी शिंदे विद्यालयाचा 100 टक्के निकाल
कन्हेरगाव(प्रतिनिधी)
सोजरताई विकास मंडळ निमगाव (टें) संचलित बबनरावजी शिंदे माध्य व उच्च माध्य विद्यालय अकोले (खुर्द) ता. माढा या विद्यालयाचा शंभर टक्के निकाल लागला असून यामध्ये प्रथम क्रमांक प्रज्वल दशरथ घाडगे ९८ टक्के,व्दितीय क्रमांक गौरवी विजय मोरे ९७.२० टक्के तृतीय क्रमांक गौरी संतोष पाटील ९६.६० टक्के गुण मिळवत यश संपादन केले आहे तर गणित विषयात महाराष्ट्र राज्यात प्रथम प्राची बंडू कुटे ९७.२० टक्के गुण मिळवून यश संपादन केले आहे.
या विद्यालयाचे १५० विद्यार्थ्यांपैकी ११८ विद्यार्थी विशेष प्राविण्यासह तर ३१ विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले. तर १ विद्यार्थी द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण झाले.
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे आमदार बबनरावजी शिंदे,संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आमदार संजयमामा शिंदे, सोलापूर जिल्हा दूध संघाचे चेअरमन रणजीत भैय्या शिंदे,सभापती विक्रमदादा शिंदे, माढा वेल्फेअर फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष धनराज दादा शिंदे,निमगाव चे सरपंच यशवंत भैय्या शिंदे,संस्थेचे सचिव तथा प्राचार्य राजेंद्र ठोंबरे, कै. विठ्ठलरावजी शिंदे प्रशालेचे प्राचार्य ,रजपूत सर, प्रशालेतील सर्व शिक्षक,शिक्षिका आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन करून पुढील शिक्षणासाठी शुभेच्छा दिल्या...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा