*18 वर्षीय मुलीस पळवून नेल्याप्रकरणी संशयितांविरुध्द न्यायालयाचा सर्च वाँरंटचा आदेश - अँड. श्रीनिवास कटकुर*
* *सोलापूर* *
*पीडित मुलगी कु. ऐश्वर्या वय - 18 वर्ष 4 महीने राहणार - होटगी रोड , सोलापूर हिसू खोटे आमिष दाखवुन फूस लावून पळवून नेल्याप्रकरणी संशयितांच्या घरी मुलीचा शोध घेऊन मा. न्यायालयासमोर मुलीला सोमवार दिनांक 27/6/2022 पर्यंत हजर करणे बाबत मेहरबान. कोर्टाने विजापूर नाका पोलीस स्टेशन यांना सर्च वारंट द्वारे मुलीचा शोध करण्यात यावा, असा आदेश माननीय. प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी कोर्ट नंबर 2 अनुपमा पारशेट्टी जज्ज मँडम यांनी केलेला आहे*
*यात सविस्तर हकीकत अशी की*
कुमारी. ऐश्वर्या ( नाव बदललेले) वय 18 वर्षे चार महिने राहणार होटगी रोड सोलापूर हिस फुस लावून खोटे आमिष दाखवून सोलापूर येथून पंधरा दिवसापूर्वी सामनेवाला सोहम माने व त्यांच्या कुटुंबीयांनी मुलीचे जीवाचे बरे- वाईट करण्याच्या उद्देशाने तिच्या मनाविरुद्ध तिला बंदिस्त करून लपवून ठेवल्याप्रकरणी सोहम माने , सुजाता माने , अजय माने, चेतन माने सर्व राहणार - हत्तुरे वस्ती सोलापूर यांच्याविरुद्ध प्रथम संबंधित पोलिस स्टेशनला मुलीच्या वडिलांनी मिसिंग कंप्लेंट व किडनँपिंगची केस पोलिसात तक्रार दिली होती व पोलिसांनी अनेक ठिकाणी शोध घेऊन सुद्धा मुलगी सापडत नव्हती, त्यामुळे शेवटी मुलीच्या वडिलांनी मुलीचा शोध घेऊन तिचा ताबा मिळण्याकरिता सोलापूर येथील मे. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी श्रीमती अनुपमा पारशेट्टी न्पायाधीश मॅडम यांच्या कोर्टात क्रिमिनल प्रोसीजर कोड 1973 कलम 97 अन्वये सर्च वाँरंटची केस सोलापुरातील नामवंत फौजदारी विधिज्ञ अँड. श्रीनिवास कटकुर यांच्यामार्फत न्यायालयात फौजदारी खटला मुलीच्या वडिलांनी संशयित सामनेवाला माने विरुद्ध खटला दाखल केला व त्यात प्रामुख्याने मुलगी कुमारी. ऐश्वर्या ही पंधरा दिवसापूर्वी सोहम माने यांनी खोटे आमिष दाखवून मुलीस पळवून नेऊन जवळच्या नातेवाईकांकडे मुलीच्या इच्छेविरुद्ध तिला बंदिस्त केल्या प्रकरणी मुलीचा संशयिताकडे सोहम माने व त्यांचे कुटुंबीय व नातेवाईकांकडे शोधून तिला मेहरबान. कोर्टात सादर करण्यासाठी केस दाखल केली व याबाबत मेहरबान. कोर्टाने संशयित सामनेवाला यांना नोटीस बजावुन सुद्धा ते मुलीस मुदतीत न्यायालयात हजर केले नव्हते, त्यासाठी अर्जदाराचे विधिज्ञ अँड. श्रीनिवास कटकुर यांनी अंतिम युक्तिवाद यामध्ये अशी बाजू मांडण्यात आले की, नुकतीच मुलगी सज्ञान झाली होती व तिला खोटेनाटे आमिष दाखवून संशयित सामनेवाला सोहम माने व त्यांच्या कुटुंबीयांच्या मदतीने मुलीस सोलापूर येथून पळवुन तिला अज्ञातस्थळी बंदिस्त करून तिच्या इच्छेविरुद्ध ठेवलेले आहे व मुलीच्या जीवितास सामनेवाला यांच्याकडून गंभीर असा धोका निर्माण झालेला आहे , व मुलीच्या जीवाचे वाईट करण्याच्या उद्देशाने सामनेवाला हा तिला मे. कोर्टासमोर आणण्यास धजावत नाही त्यामुळे मुलीच्या जिवीताचे सुरक्षेसाठी व प्रकरणाचे गांभिर्य पाहुन मे. न्यायालयाने ॲड. कटकुर वकील यांचा युक्तिवाद ग्राहय धरुन व सबळ पुरावा पाहून व केसचे गांभिर्य पाहुन सामनेवाला विरुद्ध क्रिमिनल प्रोसीजर कोड कलम 97 नुसार आदेश काढण्यात आला व मुलगी कुमारी. ऐश्वर्या हिचा शोध पोलिसांनी सामनेवाला कडे करून मुलीचा तपास करून तिला कुठे लपवले तिथे तिचा शोध घेऊन माननीय. न्यायालय समोर दिनांक 27/6/2022® रोजी सकाळी 11 वाजेपर्यंत मुलीचा शोध घेऊन तिला हजर करण्याबाबत आदेश संबंधित पोलीस स्टेशनला करण्यात आला .व
*याकामी मुलीच्या वडिलांकडून नामवंत विधिज्ञ एडवोकेट .श्रीनिवास कटकुर व एडवोकेट. किरण कटकुर व एडवोकेट. आनंद सागर यांनी काम पाहिले* .
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा