Breaking

शनिवार, ११ जून, २०२२

जांभुळणी येथे चौथ्या लाटेतील दुसरा रुग्ण हि मुंबई वरुन आलेला निघाला पॅजिटीव्ह


जांभुळणी येथे चौथ्या लाटेतील दुसरा रुग्ण हि मुंबई वरुन आलेला निघाला पॅजिटीव्ह



म्हसवड प्रतिनिधी : 
 माण तालुक्यातील जांभुळणी येथे चौथ्या लाटेतील दुसरा कोरोना पॅजिटीव्ह रुग्ण पुळकोटी प्राथमिक आरोग्य केंद्रात सापडला आसुन दोन दिवसांपूर्वी मुंबई वरुन एक खाजगी ट्रॅव्हल घेऊन आलेला ३५ वर्षी रुग्णाची नोंद झाली आसुन या महिन्यात चौथ्या लाटेतील दुसरा बाहेर गावावरुन आलेला सापडल्याने स्थानिक नागरीका मध्ये भितीदायक वातावरण निर्माण झाले आसुन बाहेर गावावरुन आलेल्या रुग्णाची भिती नागरीकांना वाटू लागली आहे बाहेर गावावरुन येणाऱ्या बाधीत रुग्णाचा बंदोबस्त करणार तरी कोण रुग्णाची संख्या वाढल्यावर आरोग्य विभाग, स्थानिक  प्रशासन  जागे होणार का 
       गेल्या महिण्याच्या शेवटच्या आठवड्यात मुंबई वरुन आलेला पुळकोटी येथील रुग्ण पुळकोटी आरोग्य केंद्रात तपासणीत आढळला त्याचेवर उपचार करुन तो बरा झाला घरातील मंडळीची हि तपासणी निगेटिव्ह आल्याने आरोग्य विभागाचा जिव भाड्यात पडला असताना पुन्हा एकदा तिन दिवसापूर्वी म्हसवड मुंबई या खाजगी ट्रॅव्हल वर ड्रायव्हर म्हणून असलेला जांभुळणी येथील  ३५ वर्षी युवक पुळकोटी आरोग्य केंद्रात सर्दी, ताप व खोकला येत असल्याने आला होता त्याची तपासणी केली आसता तो पॅजिटीव्ह निघाला त्याला जांभुळणी येथील त्याच्या घरीच होम क्वारंन्टाईन करण्यात आले आसुन घरातील सर्वाची तपासणी निगेटिव्ह आली असली तरी रोज शेकडो लोक आठ ट्रॅव्हल मधून म्हसवड व परिसरात येत असतात त्याचे काय करायचे प्रशासन पॅजिटीव्ह रुग्णाची संख्या वाढल्यावर दखल घेणार का असा सवाल नागरीक करत आहेत 
 या आठवड्यात पुळकोटी आरोग्य केंद्रात ४५ तपासणी करण्यात आली त्यापैकी दुसरा रुग्ण सापडला तर बाकीच्या सर्व तपासण्या निगेटिव्ह आल्या आहेत बुस्टर डोस चालू आसुन ज्या नागरीकांचा राहिला आसेल त्यांनी त्वरीत घ्यावा असे आवाहन पुळकोटी आरोग्य केंद्राचे वैदयकीय अधिकारी यांनी सांगितले
तर म्हसवड प्राथमिक आरोग्य केंद्रात या आठवड्यात २२ तपासणी करण्यात आल्या त्या सर्व निगेटिव्ह आल्या आसुन नागरीकांनी कोरोना नियम व अटीचे पालन करुन मास्कची सक्ती सर्व आॅफिस मध्ये करण्याची गरज आहे असे म्हसवड प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैदयकीय अधिकारी जगदाळे यांनी सांगितले


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा