श्रीगोंदा पोलीसांची पहिल्यांदाच अवैद्य दारु / गावठी हातभट्टीवर धडक कारवाई.....
हप्त्यांची मात्र नागरिकांमध्ये जोरदार चर्चा...
श्रीगोंदा-नितीन रोही,
सविस्तर असे की जिल्हा पोलीस अधीक्षक.मनोज पाटील,साहेब यांनी अहमदनगर जिल्हयामध्ये दिनाक 23/06/2022 ते दिनाक 30/06/2022 पर्यंत अवैद्य दारु, गावठी हातभट्टी. याबाबत कार्यवाही करणेसाठी विशेष मोहिम राबण्याबाबत आदेश दिले होते त्या अनुषंगाने श्रीगोंदा पोलीस स्टेशन हद्दीत श्रीगोंदा कारखाना, पेडगांव, जामदार मळा काष्टी, शेडगांव, टाकळी कडेवळी, कोसेगव्हाण, कोकणगांव. आढळगावं. लोणी व्यंकनाथ. पारगांव श्रीगोंदा शहर. या ठिकाणी पोलीसांणी छापे टाकुन गावठी दारु हातभट्टी रसायण नाश करुन दारुबंदी कायद्या अंतर्गत 23 गुन्हे दाखल करुन 25 आरोपी अटक केले
2.66.921 रुपायचा मुद्देमाल नाश केला आहे.
नमुद कारवाई श्री मा. मनोज पाटील, मा. पोलीस अधिक्षक अहमदनगर, श्री. सौरभ अग्रवाल अप्पर पोलीस अधिक्षक अहमदनगर, व श्री आण्णासाहेब जाधव उप विभागीय पोलीस अधिकारी कर्जत विभाग कर्जत यांच्या मार्गदर्शणा खालील पोलीस निरीक्षक श्री रामराव ढिकले व पोसई समीर अभंग. अमित माळी सुनिल सुर्यवंशी, सर्व बिटचे पोलीस अंमलदार व कर्मचारी. डि बी पथक यांनी केली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा