सोलापूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या मातोश्री गिरीजाबाई भरणे यांचे निधन, भरणेवाडी येथे दुपारी दोन वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार.
करमाळा प्रतिनिधी
राज्याचे माजी राज्यमंत्री, सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री व आमदार दत्तात्रय भरणे यांच्या मातोश्री गिरीजाबाई विठोबा भरणे यांचे वृद्धापकाळाने आज निधन झाले. मृत्यू समयी त्यांचे वय ८३ वर्षाचे होते. त्यांच्या पश्चात माजी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, मार्केट कमिटीचे संचालक मधुकर भरणे यांच्यासह चार भाऊ, तीन बहिणी, सुना, नातवंडे असा परिवार आहे. त्यांचा अंत्यविधीचा कार्यक्रम आज दुपारी दोन वाजता भरणेवाडी येथील त्यांच्या घराजळील शेतात करण्यात येणार आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा