Breaking

शनिवार, ३० जुलै, २०२२

उमरा ग्रामपंचायतीवर महिलाराज १३ पैकी ७ जागेवर महिला राखीव-सरपंच मात्र थेट जनतेतून



उमरा ग्रामपंचायतीवर महिलाराज १३ पैकी ७ जागेवर महिला राखीव-सरपंच मात्र थेट जनतेतून


लोहा प्रतिनिधी

लोहा :लोहा तालुक्यातील राजकीय वर्तुळात सदा अग्रेसर असलेल्या उमरा येथील ग्रामपंचायत मध्ये एकूण १३ सदस्य आहेत यापैकी ७ जागेवर प्रत्येकी वार्डात एक महिला राखीव जागा ठेवण्यात आली आहे.उमरा ग्रामपंचायतीत १३ सदस्य असून पाच वार्ड आहेत.नुकतेच कोर्टाने ओबीसी आरक्षण जाहीर केले असून वॉर्डरचनेतही बदल करण्यात आला आहे.वार्ड क्र.१ मध्ये पूर्वी तीन जागा असलेल्या वार्डामध्ये आता केवळ दोनच जागा राहणार आहेत.

यामध्ये वार्ड क्र.१ सदस्यसंख्या २ आरक्षण सर्वसाधारण १ सर्वसाधारण स्त्री राखीव १ वार्ड क्र.२ सदस्यसंख्या ३ सर्वसाधारण  १ सर्वसाधारण स्त्री राखीव १ ना.मा.प्र.स्त्री राखीव १ वार्ड क्र.३ सदस्यसंख्या ३ अनु.जाती १ सर्वसाधारण स्त्री १ ना.मा.प्र. स्त्री राखीव १ वार्ड क्र.४ सदस्यसंख्या ३ सर्वसाधारण १ सर्वसाधारण स्त्री राखीव १ ना.मा.प्र.१ वार्ड क्र.५ सदस्यसंख्या २ सर्वसाधारण  १ सर्वसाधारण स्त्री राखीव १ अशाप्रकारे आरक्षण जाहीर करण्यात आले आहे.

तर उमरा ग्रामपंचायतचे वार्डनिहाय आरक्षण जाहीर होताच अनेकांचे धाबे दणानले आहे.तर अनेकांनी डोक्याला बाशिंग बांधले आहे.सध्यस्थितीला तरी संदीप उमरेकर,ब्रम्हानंद सिररसाट संभाजी ब्रिगेडचे बालाजी सिरसाट हे तीनही गट एकमेकांच्या विरोधात प्रतिस्पर्धी म्हणून निवडणूक रिंगणात उतरले असून दुसरीकडे मात्र बलाढ्य घराणे शाहिच्या राजकारणाला शह देत संभाजी ब्रिगेडचे बालाजी सिरसाट यांनीही उडी घेतली आहे.मात्र अद्यापही त्यांनी स्वतंत्र लढायचे की कोणत्या गटामध्ये सामील व्हायचे कोणाला साथ द्यायची की अपक्षच आपली जागा लढवायची हा सस्पेन्स मात्र त्यांनी कायम ठेवला आहे.त्यांच्या भूमिकेकडे मात्र गावकऱ्यांचे लक्ष लागले आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा