Breaking

शनिवार, ३० जुलै, २०२२

विरोधी पक्षनेते मा.अजित पवार यांनी केली किनवट माहूर तालुक्यातील अतिवृष्टीग्रस्त भागाची पाहणीमा.आ.प्रदीप नाईक यांनी अतिवृष्टीने नुकसान झालेल्या पिकासंदर्भात विरोधी पक्षनेते अजित पवार यांना माहिती दिली.



विरोधी पक्षनेते मा.अजित पवार यांनी केली किनवट माहूर तालुक्यातील अतिवृष्टीग्रस्त भागाची पाहणी


मा.आ.प्रदीप नाईक यांनी अतिवृष्टीने नुकसान झालेल्या पिकासंदर्भात विरोधी पक्षनेते अजित पवार यांना माहिती दिली.

नांदेड जिल्हा प्रतिनिधी
बालाजी सिरसाट

माहूर : किनवट माहूर तालुक्यामध्ये अतिवृष्टी व ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्याने किनवट माहुर तालुक्यातील शेतीसह पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अशा या नुकसान झालेल्या पिकाची पाहणी करण्यासाठी माजी उपमुख्यमंत्री तसेच विरोधी पक्षनेते अजित दादा पवार व माजी समाज कल्याण मंत्री धनंजय मुंडे यांनी आज किनवट माहूर विधानसभा क्षेत्रातील दत्त मांजरी, वझरा, मांडवा, कुपट्टी या गावातील शेत बांधावर जाऊन नुकसान झालेल्या पिकाची प्रत्यक्ष पाहणी केली. व अजित पवार यांनी दत्तमांजरी येथील शेतकरी लक्ष्मण देवा,आर के व जनार्दन दगडू केंद्रे या शेतकऱ्यांशी प्रत्यक्ष संवाद साधला.
यावेळी माजी आमदार प्रदीप नाईक यांनी किनवट माहुर विधानसभा क्षेत्रात अतिवृष्टीने नुकसान झालेल्या पिकासंदर्भात विरोधी पक्षनेते अजितदादा पवार यांना माहिती दिली. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे किनवट माहूर विधानसभा सरचिटणीस मनोज कीर्तने यांनी अतिवृष्टीने शेतकरी हैराण असताना त्यातच वन्य प्राणी कोवळी पिके फस्त करून पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान करत असल्याबाबत अजित दादा पवार यांच्याकडे शेतकऱ्या विषयी पोट तिडकीने कैफीयत मांडली.
या दौऱ्या दरम्यान माजी समाज कल्याण मंत्री धनंजय मुंडे माजी आमदार प्रदीप नाईक माजी जिल्हा परिषद सदस्य समाधान जाधव, नगर अध्यक्ष फिरोज दोसानी, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष मेघराज जाधव, युवक तालुका अध्यक्ष मारुती रेकुलवार, राष्ट्रवादीच्या महिला तालुका अध्यक्षा नम्रता कीर्तने, राष्ट्रवादी किनवट तालुका अध्यक्ष प्रकाश गब्बर राठोड, माजी जिल्हा परिषद सदस्य बंडूसिंग नाईक, विशाल जाधव, मधुकर बाबा राठोड, जहरोदिन खान, यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते आणि शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा