Breaking

गुरुवार, २८ जुलै, २०२२

तुम्ही सर्वजण मुख्यमंत्रीच ; समाजातील शेवटच्या घटका पर्यंत जा..! सरकारची सर्व ताकद देईन.--- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे। ............. ■ मूळ शिवसेनेला खिंडार ; मोहोळचे क्षीरसागर , व माढ्याचे कोकाटे शिवसेनेच्या शिंदे गटात दाखल



तुम्ही सर्वजण मुख्यमंत्रीच ; समाजातील शेवटच्या घटका पर्यंत जा..! सरकारची सर्व ताकद देईन.
--- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे


मूळ शिवसेनेला खिंडार ; मोहोळचे क्षीरसागर , व माढ्याचे कोकाटे शिवसेनेच्या शिंदे गटात दाखल 

मुंबई- प्रतिनिधी /मिलिंद माने 

■ हिंदुत्व व विकास ही मी घेतलेली भूमिका आपण स्वीकारून माझ्यासोबत येण्याचा आपण दोघांनी जो निर्णय घेतला आहे.त्याचे मी स्वागत करतो. तर आत्ता आपले सर्वांचे सरकार आहे.जरी मी मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर बसलो असलो तरी तुम्ही सर्वजण मुख्यमंत्री आहात. या सत्तेचा उपयोग राज्यातील सर्वसामान्य जनतेच्या हिताच्या कामासाठी झाला पाहिजे.यासाठी समाजातील शेवटच्या घटकापर्यंत जावा सरकार , शासन म्हणून जी ताकद पाहिजे ती सर्व मी आपल्या पाठीशी उभी करेन असे आश्वस्त राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले असल्याची माहिती शिवसेनेचे माढा विधानसभेचे उमेदवार संजय बाबा कोकाटे व मोहोळचे शिवसेनेचे युवा नेते सोमेश क्षीरसागर यांनी भ्रमणध्वनीद्वारे "aj24taas news " शी बोलतांना दिली.


मागील विधानसभा निवडणुकीत शिवसेनेने सहा उमेदवार उभे केले होते.यातील सांगोल्याचे आमदार शहाजी बापू पाटील हे यापूर्वीच शिंदे गटात सामील झालेले आहेत. बार्शीचे दिलीप सोपल , सोलापूरचे  दिलीप माने  व करमाळ्याच्या रश्मी बागल यांनी अद्याप कुठलाच निर्णय घेतला नाही.मात्र माढा विधानसभेचे उमेदवार संजय बाबा कोकाटे यांना ७८ हजार मते मिळाली होती.तर मोहोळ विधानसभा मतदारसंघातून नागनाथ भाऊ क्षीरसागर यांना ७० हजार मते मिळाली होती.सोमेश क्षीरसागर हे नागनाथ क्षीरसागर यांचे चिरंजीव आहेत.

आ.शहाजी बापू पाटील यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्र्यांच्या दालनात  संजय कोकाटे व सोमेश क्षीरसागर या दोघांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटून  आपल्या भूमिकेशी सहमत असल्याचे  पत्र दिले . व  शिवसेनेच्या  शिंदे गटात सामील झाले या घटनेमुळे   जिल्ह्यातील मूळ शिवसेनेला मोठे खिंडार पडले आहे.


चौकट .. ......


" मोहोळ व माढा विधानसभा मतदारसंघाच्या  विकासाचा बॅकलॉग भरून काढणार "


मोहोळ व माढा विधानसभा मतदारसंघात वर्षानुवर्षे अनेक विकासाचे प्रश्न , कामे प्रलंबित आहेत. ती मार्गी लावण्यासाठी व हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे व धर्मवीर आनंद दिघे या महान विभूतींचे प्रखर हिंदुत्ववादी विचाराच्या भूमिका   मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी घेतली आहे.त्या भूमिकेचे समर्थन करण्यासाठी आम्ही ना. शिंदे यांच्या सोबत जातो आहोत . आज दोन्ही विधानसभा मतदारसंघात  विद्यमान लोकप्रतिनिधींनी कितीही कोटींच्या विकासकामांच्या गप्पा मारल्या तरी अनेक गावांत जाण्यासाठी रस्ते नाहीत.अनेक गावांत पायाभूत मूलभूत सुविधा उपलब्ध नाहीत.मुख्यमंत्री महोदयांनी तुम्ही मुख्यमंत्री आहात जा तुमच्या मतदारसंघात मोठ्या आत्मविश्वासाने  विकासकामे करा जनतेची सेवा करा याचे फळ येणाऱ्या काळात जनता  तुम्हाला नक्कीच देईल असे आश्वस्त केले आहे. त्यामुळे आ.प्रा.तानाजी सावंत , प्रा.शिवाजी सावंत  यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर जिल्ह्यात शिंदे गटाची शिवसेना वाढविणार आहोत.
--- सोमेश आबा क्षीरसागर व संजय बाबा कोकाटे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा