सोलापूर जिल्ह्यातील नगरपालिका निवडणुकीचा कार्यक्रम अखेर जाहीर
AJ24Taas News Maharashtra network
***************************
करमाळा प्रतिनिधि राज्यातील ९२ नगरपालिकांसह ४ नगरपंचायतीच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. त्यामध्ये सोलापूर जिल्ह्यातील क वर्गातील मोहोळ, दुधनी, करमाळा, कुर्डवाडी, मैंदर्गी, मंगळवेढा, सांगोला, अ वर्गातील बार्शी व ब वर्गातील अक्कलकोट, पंढरपूर व माळशिरस या नगरपालिकांसह अनगर नगरपंचायतीच्या निवडणुकीचा समावेश आहे. राज्य निवडणूक आयोगाचे सचिव किरण कुरुंदकर यांनी याबाबत जिल्ह्याधिकार्यांना आदेश दिले आहेत.
राज्य निवडणूक आयोगाचे सचिव कुरुंदकर यांनी म्हटले आहे की, २० जुलैला जिल्हाधिकारी निवडणूक कार्यक्रम जाहीर करतील. २२ जुलै सकाळी ११ वाजलेपासून २८ जुलै दुपारी २ वाजेपर्यंत इच्छुक उमेदवारांना ऑनलाईन अर्ज दाखल करता येणार आहेत. हे अर्ज स्वीकारण्यासाठी २२ पासून २८ ला दुपारी ३ वाजेपर्यंत मुदत असणार आहे. यामध्ये २३ व २४ या सुट्टीच्या दिवशी अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
२९ जुलैला छाननी होणार आहे ते ४ ऑगस्टला दुपारी ३ वाजेपर्यंत अपील नसलेले अर्ज मागे घेता येणार आहेत. ८ ऑगस्टपर्यंत अर्जावर अपील असल्यास उमेदवारांची यादी प्रसिद्द झाल्यापासून तीन दिवसाच्या आत जिल्हा न्यायाधीशांकडे अपील करता येईल. निवडणूक निर्णय अधिकारी यांनी अपिलाचा निर्णय लवकरातलवकर प्राप्त करून घेण्यासाठी प्रयत्न करणार आहेत.
१८ ऑगस्ट २०२२ रोजी गुरुवारी सकाळी साडेसात पासून सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत मतदान होणार आहे. शुक्रवारी १९ तारखेला सकाळी १० वाजलेपासून मतमोजणी सुरु होणार आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा