Breaking

शनिवार, ९ जुलै, २०२२

उमरा परिसरात पुरामुळे अनेक गावांचा संपर्क तुटलाआमदार श्यामसुंदर शिंदे यांच्याकडून पूर परिस्थितीची पहाणी


उमरा परिसरात पुरामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला
आमदार श्यामसुंदर शिंदे यांच्याकडून पूर परिस्थितीची पहाणी


नांदेड जिल्हा प्रतिनिधी
बालाजी सिरसाट

लोहा : जिल्ह्यासह उमरा,मारतळा परिसरात शुक्रवारी (ता.८) मध्यरात्रीपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले असून नदी व नाल्याला आलेल्या पुरामुळे उमरा ते ढगारी तांडा,परमेश्वर तांडा ते सुगाव भूकमारी लाडका व कापशी ते हिंदोळा सुगाव ते सोमठाणा कापशी ते वाळकी (खुर्द) व धनंज (खुर्द) उमरा लगतच्या पुलावरून पुराचे पाणी वाहत असल्याने सदर गावांचा संपर्क शनिवार (ता.९) तुटला होता.पूरपरिस्थितीमुळे पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांशी आमदार श्यामसुंदर शिंदे यांनी संवाद साधला.व सर्व परिस्थितीची विचारपूस करून पाहणी केली.तर सखल भागात पाणी साचून पिके पाण्याखाली गेल्याने व काहींच्या जमिनी खरडून शेकडो शेतकऱ्यांच्या कवळ्या पिकाचे मोठे नुकसान झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

तसेच धनंज खुर्द येथे पुरामुळे खचून गेलेल्या पुलाची आमदार श्यामसुंदर शिंदे यांनी पाहणी करून धनंज येथील सरपंच प्रतिनिधी व्यंकटराव सावळे यांच्याशी संपर्क करून गावकऱ्यांची विचारपूस केली व सार्वजनिक बांधकाम विभागाला पुलाच्या दुरुस्तीचे आदेश दिले.यावेळी उपविभागीय अधिकारी डॉ.शरद मंडलिक,तहसीलदार व्यंकटेश मुंडे सा.पोलीस निरीक्षक श्री.देवकते काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस भास्करराव पाटील जोमेगावकर मंडळ अधिकारी श्री.सहारे सुगाव सज्जाच्या तलाठी ए.एम.गिरडे जोमेगाव सज्जाचे तलाठी श्री.अचकूलकर यांच्यासह गावातील शेतकरी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा