Breaking

रविवार, १० जुलै, २०२२

विठ्ठलराव शिंदे कारखान्याचे कार्यकारी संचालक संतोष.एन. डिग्रजे यांची डेक्कन शुगर टेक्नोलॉजिस असोसिएशन ,इंडिया च्या कौन्सिल पदी बिनविरोध निवड .




विठ्ठलराव शिंदे कारखान्याचे कार्यकारी संचालक संतोष.एन. डिग्रजे यांची डेक्कन शुगर टेक्नोलॉजिस असोसिएशन ,इंडिया च्या कौन्सिल पदी बिनविरोध निवड .

बेंबळे। प्रतिनिधी मुकुंद रामदासी

 माढा तालुक्यातील पिंपळनेर येथील विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक संतोष नाभिराज डिग्रजे यांची "डेक्कन शुगर टेक्नोलॉजिस असोसिएशन इंडिया"च्या कौन्सिल पदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
    या निवडीनंतर कारखाना स्थळावर कामगारांच्या वतीने मोठा जल्लोष करण्यात आला. विठ्ठलराव शिंदे कारखान्याने सिझन 2021/2022 मध्ये २४लाख ७६हजार मे.टन उसाचे गाळप करून देशात प्रथम क्रमांक मिळविला आहे. यामध्ये विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक संतोष.एन. डिग्रजे यांचे प्रशासकीय कौशल्य मोलाचे आहे व त्यामुळेच डिग्रज  हे विठ्ठलराव शिंदे कारखान्याला प्रगतिपथावर नेण्याचे काम करित आहेत,त्यामुळे कारखान्याचे सर्व संचालक, विभाग प्रमुख अधिकारी, कामगार व शेतकऱ्यांमधुन समाधान व्यक्त केले जात आहे.
       या निवडीबद्दल डिग्रजे यांचे आमदार बबनराव शिंदे , आमदार संजयमामा शिंदे , जिल्हा दूध संघाचे चेअरमन रणजितसिंह शिंदे सभापती विक्रम दादा शिंदे कारखान्याचे सर्व संचालक, हीथचिंतक व मान्यवरानी त्यांचे अभिनंदन केले आहे. डिग्रजे यांची "शुगर टेक्नोलॉजिस असोसिएशन इंडिया"च्या कौन्सिल पदी बिनविरोध निवड झाल्यामुळे, "डायरेक्ट -इन -डायरेक्ट सोशल मीडिया"च्या माध्यमातून व प्रत्यक्ष भेटून त्यांचेवर शुभेच्छांचा वर्षाव केला जात आहे.  यावेळी विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याचे सर्व अधिकारी, पदाधिकारी, कामगार व शेतकरी बांधव उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा