Breaking

बुधवार, २४ ऑगस्ट, २०२२

रिपब्लिकन पक्षाच्या राज्य कार्यकारिणीची उद्या पुण्यात महत्वपूर्ण बैठक केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवले करणार मार्गदर्शन रिपाइं च्या नवीन राज्य कार्यकारीणीसाठी होणार निवडणूक



रिपब्लिकन पक्षाच्या राज्य कार्यकारिणीची उद्या पुण्यात महत्वपूर्ण बैठक 


केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवले करणार मार्गदर्शन 
रिपाइं च्या नवीन राज्य कार्यकारीणीसाठी होणार निवडणूक

मुंबई दि. 24- रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ( आठवले)  या पक्षाची महाराष्ट्र राज्य कार्यकारीणी ची महत्वपूर्ण बैठक उद्या गुरुवार दि.25 ऑगस्ट रोजी पुण्यातील  शिवाजी नगर येथील बालगंधर्व रंगमंदिर येथे सकाळी 11 वाजता रिपाइं चे राष्ट्रीय अध्यक्ष  केंद्रियराज्यमंत्री ना.रामदास आठवले यांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आली आहे. रिपब्लिकन पक्षाच्या देशभरातील सर्व राज्य कार्यकारीणी आणि जिल्हा कार्यकारीणी बरखास्त करण्यात आल्यानंतर महाराष्ट्र राज्य कार्यकारिणी च्या बैठकीकडे सर्व रिपब्लिकन कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे. रिपाइं ची राज्य कार्यकारीणी बरखास्त झाल्यानंतर नवीन राज्य कार्यकारीणी ची निवडणूक उद्या होणाऱ्या रिपाइं च्या राज्य कार्यकारीणी च्या बैठकीत  होईल. त्यामुळे रिपाइं च्या  नवीन राज्य  कार्यकारीणीचे अध्यक्ष पद कुणाला मिळणार ? कोण  राज्य कमिटी अध्यक्षपदी निवडून येणार ? रिपाइं चे राष्ट्रीय अध्यक्ष ना.रामदास आठवले राज्य कार्यकरिणी च्या अध्धाक्ष पदासाठी कुणाला पसंती देणार याकडे राज्यभरातील रिपाइं कार्यकर्त्यांचे रिपब्लिकन जनतेचे लक्ष लागले आहे. 

 रिपब्लिकन पक्षाच्या राज्य कार्यकारीणी च्या बैठकीला रिपाइं चे क्रियाशील सदस्य यांनी उपस्थित राहण्याचे रिपाइं तर्फे कळविण्यात आले असून रिपाइं च्या महाराष्ट्र राज्य कमिटी वर राज्यातील मुंबई; कोकण;पाश्चिम महाराष्ट्र; विदर्भ अमरावती विभग आणि नागपूर विभाग; मराठवाडा; उत्तर महाराष्ट्र या विभागाला समप्रमाणात  प्रतिनिधित्व  देण्यात येणार आहे. राज्यातील सर्व विभागांना आणि सर्व जाती धर्मीयांना योग्य संधी राज्य कार्यकारीणी मध्ये देण्याचा आमचा प्रयत्न असेल राज्य कार्यकरिणी ची निवड उद्या दि.25 ऑगस्ट 2022  रोजी होणाऱ्या बैठकीत पुण्यात होईल अशी माहिती ना.रामदास आठवले यांनी दिली आहे.

हेमंत रणपिसे प्रसिध्दीप्रमुख

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा