Breaking

शनिवार, १० सप्टेंबर, २०२२

सिंधी समाजातर्फे गणेश विसर्जन भक्तांना महाप्रसाद लंगर खाण्याचे वाटप.*


*सिंधी समाजातर्फे गणेश विसर्जन भक्तांना महाप्रसाद लंगर खाण्याचे वाटप.*



करमाळा प्रतिनिधी 
गणेश विसर्जनाच्या दिवशी गणरायाला निरोप देताना आलेल्या गणेश भक्तांना करमाळा शहरातील सिंधी समाज बांधवांच्या वतीने लंगर खाना अर्थात महाप्रसाद वाटप करण्यात आले सदरचा कार्यक्रम वेताळ पेठ येथील जुम्मा मशिदीसमोर हा कार्यक्रम झाला

सदरचा कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून छत्रपती शिवाजी तरुण मंडळ मंडळाचे विठ्ठल आप्पा सावंत तसेच या मशिदीचे उस्मान शेख व त्यांचे सहकारी यावेळी उपस्थित होते
सदरचा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी सिंधी समाजाचे पप्पु शेठ सिंधी,चेतन कींगर, संदीप चुंग, मुन्ना हसीजा ,अमित चुंग ,संजीत चुंग,गोलू सिंधी,महेश किंगर आदींनी विशेष परिश्रम घेतले.
सिंधी समाजाचे आद्य प्रवर्तक गुरुनानक यांनी लंगर खाना ही एक प्रकारे शिकवण दिली होती त्या शिकवणीला अनुसरून आज गणेश भक्तांना अर्थात महाप्रसाद चे वाटप करण्यात आल
सिंधी समाजाने सदर लंगरचा कार्यक्रम ठेवून समाजासमोर एक प्रकारे राष्ट्रीय एकात्मतेचे आगळे वेगळे दर्शन घडविले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा