उंबरे पागे येथे माता सुरक्षित तर घर सुरक्षित मोहिमेचे सौ. रंजनीताई देशमुख व माजी सभापती परमेश्वर लोंढे यांच्या हस्ते उद्घाटन
टेंभुर्णी प्रतिनिधी/
आरोग्यवर्धिनी केंद्र उंबरे पागे तालुका पंढरपूर येथे येथे आज दिनांक 27/09/2022 रोजी "माता सुरक्षित तर घर सुरक्षित" मोहिमेचे उद्घाटन मा.सौ रजनीताई देशमुख माझी सभापती महिला व बालकल्याण सोलापूर मा. परमेश्वर लोंढे माजी सरपंच उंबरे पागे व सौ पाटील मॅडम माजी सरपंच कान्हापुरी यांच्या उपस्थितीत करण्यात आले,
यावेळी गर्भवती महिलांचे वजन, उंची ,रक्तदाब तपासणी रक्ताच्या व लघवीच्या तपासण्या करण्यात आल्या तसेच बाळाच्या हृदयाचे ठोकेही तपासण्यात आले तसेच अतिजोखमीच्या मातांची विशेष तपासणी करण्यात येऊन संदर्भ सेवा देण्यात आली गर्भवती महिलांना निधीतून सोनोग्राफीचा लाभ देण्यात आला
उपस्थित सर्व महिलांना महिलांचे आरोग्य आहाराबाबत घ्यावयाची काळजी याबाबत डॉक्टर सौ साखरे पीएस वैद्यकीय अधिकारी यांनी मार्गदर्शन केले सदर कार्यक्रमासाठी आरोग्य कर्मचारी गटप्रवर्तक उंबरे गावातील आशा स्वयंसेविका अंगणवाडी सेविका यांची उपस्थिती होती या मोहिमेत 63 महिलांची आरोग्य तपासणी करण्यात आली सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री काझी एस पी आरोग्य निरीक्षक प्रा केंद्र उंबरे पागे यांनी केले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा