शेतकऱ्यांच्या न्याय मागण्या तात्काळ पुर्ण व्हाव्यात – खा. ओमराजे निंबाळकर
आज दि. 24 ऑक्टोंबर 2022 पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या सरकारकडून खालील महत्वाच्या मागण्या पुर्ण व्हाव्यात याकरीता मा. आमदार तथा जिल्हाप्रमुख कैलास पाटील हे उपोषणास बसले आहेत. त्या अनुषंगाने उपस्थित मा. आ. कैलास पाटील जिल्हाप्रमुख शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) यांना पाठिंबा दर्शविण्यासाठी मा. खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी आज उपोषण स्थळी भेट दिली.
याप्रसंगी धाराशिव नगरीचे माजी नगराध्यक्ष नंदुभैय्या राजेनिंबाकर, तालुका प्रमुख सतिशकुमार सोमाणी, माजी नगरसेवक राजाभाऊ पवार, आम आदमी पार्टीचे ॲड. अजित खोत तसेच अखिल भारतीय विरशैव शिवा संघटना जिल्हा धाराशिव, युवासेना, अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मुलन संघर्ष समिती, तसेच ग्रामपंचायत कार्यालय, डकवाडी, मस्सा, खेड, देवळाली, मेडसिंगा, हासेगाव, वडगाव, बोरगाव, राजुरी, चिखली, दारफळ, शेजगाव (ज), दहिफळ, मोहा, देवळाली, पळसप, सांजा, शेळका धानोरा, बहुला, देवधानोरा आदी ग्रामपंचायतींनी पाठिंबा असल्याचे जाहीर केले आहे तसेच युवासेना जिल्हाप्रमुख तथा राज्य विस्तारक अक्षय ढोबळे, धाराशिव युवासेनेचे तालुकाप्रमुख वैभव वीर, आय.टी सेल जिल्हाप्रमुख रणजित महाडिक, तुळजापूर उपतालुकाप्रमख रोहित चव्हाण, माजी पंचायत समिती सदस्य संग्रामभैय्या देशमुख, गजेंद्र जाधव, नगरसेवक सोमनाथ अप्पा गुरव, माजी शहरप्रमुख प्रविण कोकाटे, भिमाआण्णा जाधव, अतिक सय्यद, बळीराम कांबळे, तसेच अनेक शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा