Breaking

गुरुवार, ३ नोव्हेंबर, २०२२

आमदार संजयमामा शिंदे यांचा टाकळी ग्रामस्थांच्या वतीने सत्कार.आ, संजयमामा शिंदे यांच्या निर्णयाचे स्वागत .


आमदार संजयमामा शिंदे यांचा टाकळी ग्रामस्थांच्या वतीने सत्कार.आ, संजयमामा शिंदे यांच्या निर्णयाचे स्वागत 


.
कन्हेरगांव दि प्रतिनिधी ( धनंजय मोरे )

माढा तालुक्यातील म्हैसगाव येथील विठ्ठल काॅर्पोरेशन साखर कारखान्याचे चेअरमन आमदार संजयमामा शिंदे यांनी  पहिला ऊसाचा हप्ता 2300 जाहीर केल्यामुळे व ऊस वाहतूकदार यांनी कोठेही वजनकाटा करून चेक करावे असे आवाहन केल्यामुळे आमदार संजयमामा शिंदे यांच्या निर्णयाचे स्वागत करण्यात आले असून ,  त्यांचा टाकळी (टे) तालुका माढा येथील ग्रामस्थांच्या वतीने आमदार संजयमामा शिंदे यांचा सत्कार करण्यात आला.
   टाकळी तालुका माढा येथे बुधवारी  कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक  हिम्मत सोलनकर   यांच्या निवासस्थानी आमदार संजयमामा शिंदे यांच्या सत्कार समारंभ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते .
         यावेळी इंदापूर पंचायत समितीचे सदस्य प्रदिपमामा जगदाळे , जिल्हा परिषद सदस्य शिवाजी पाटील चांदजकर हिम्मत सोलनकर , लव्हे सरपंच विलास  पाटील, विठ्ठलराव शिंदे सहकारी कारखाना संचालक वेताळ जाधव ,आढेगाव सरपंच चित्राताई वाघ,माढेश्वरी संचालक भारत चंदनकर , आलेगाव सरपंच जयसिंग चंदनकर ,सरपंच आण्णा झिंजे,अमोल देवकते, राजेंद्र राजमाने, शेतकी अधिकारी थिटे , राष्ट्रवादी सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष  काकासाहेब पाटील, विलास भोसले,बापुराव वाघमोडे,गोरख सोलनकर,विकास पिसाळ ,प्रभाकर जाधव, बाळु काळे,सचिन सोनवणे,नयन सुरवसे,संदीप काळे,विश्वचरण सोलनकर, मच्छीद्र गोफणे,प्रकाश सोनवणे, बासुभई मुलाणी,गौतम गायकवाड ,रमाकांत राजमाने ,राजेंद्र पाटील,परमेश्वर श्रीराम ,किसन पाटील, कैलास पिसाळ, आदी उपस्थित होते .

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा