विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्यामार्फत दुस-या दहा दिवसाचे ऊस बील ऊस पुरवठादार शेतक-यांच्या बँक खात्यावर वर्ग-
गाळपास आलेल्या ऊसास दहा दिवसाला ऊस बिल अदा करणेची परंपरा कायम ठेवणारा राज्यातील पहिला साखर कारखाना
बेंबळे।प्रतिनिधी। /मुकुंद रामदासी बेंबळे प्रतिनिधी
विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याचे युनिट नं.1 पिंपळनेर व युनिट नं.2 करकंब येथील सन 2022-23 चा गाळप हंगाम सुरू झालेला असून या हंगामात गाळपास आलेल्या ऊसासाठी पहीला ॲडव्हान्स हप्ता प्रति टन 2350 रूपये प्रमाणे सभासद व ऊस पुरवठादार शेतक-यांच्या बँक खात्यावर वर्ग करण्यात आला असल्याची माहीती कारखान्याचे संस्थापक चेअरमन आ.बबनराव शिंदे यांनी दिली.
अधिक माहीती देताना आ.बबनराव शिंदे म्हणाले, विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याचे युनिट नं.1 पिंपळनेर व युनिट नं.2 करकंब या कारखान्याचा सन 2022-23 चा गाळप हंगाम सुरू झालेला असून बँकांकडून साखर मालतारण कर्ज खात्यावर मिळणारी उपलब्धता विचारात घेवून या हंगामात गाळपास येणा-या ऊसास पहिला ॲडव्हान्स हप्ता प्रति टन 2350 रूपये प्रमाणे सभासद व ऊस पुरवठादार शेतक-यांना देण्यात येणार आहे. या गळीत हंगामात मागील वर्षीप्रमाणे गाळपास आलेल्या ऊसास दहा दिवसाला ऊस बील पेमेंट ऊस पुरवठादारांना अदा करण्यात येणार आहे. सन 2022-23 गळीत हंगामात युनिट नं.1 व युनिट नं.2 येथे दि.19/10/2022 ते 31/10/2022 या कालावधीतील ऊस बील ऊस पुरवठादार शेतक-यांना यापूर्वीच अदा करण्यात आले आहे.दि.01/11/2022 ते दि.10/11/2022 अखेर गाळपास आलेल्या ऊसास प्रति टन रू.2350/-प्रमाणे पहिला ॲडव्हान्स हप्ता ऊस पुरवठादार शेतक-यांच्या बँक खात्यात वर्ग करण्यात आला आहे. विठ्ठलराव शिंदे कारखान्याने यापूर्वी प्रत्येक हंगामामध्ये वेळेत ऊस बिले शेतक-यांना दिली असल्याने शेतक-यांचा या कारखान्यावर प्रचंड विश्वास असल्याने अनेक शेतकरी आपला ऊस विठ्ठलराव शिंदे कारखान्याकडे देण्यास पसंती देत आहेत.
सदरप्रसंगी कारखान्याचे व्हाईस चेअरमन वामनराव उबाळे, कार्यकारी संचालक एस.एन.डिग्रजे व इतर अधिकार उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा