Breaking

बुधवार, १६ नोव्हेंबर, २०२२

लक्ष्मी-आनंदच्या विद्यार्थ्यांनी दिली 'टेंभुर्णी पोस्ट ऑफिसला' क्षेत्रभेट.*



*लक्ष्मी-आनंदच्या विद्यार्थ्यांनी दिली 'टेंभुर्णी पोस्ट ऑफिसला' क्षेत्रभेट.* 



टेंभुर्णी(प्रतिनिधी),
     लक्ष्मी आनंद विद्या मंदिर व ज्युनिअर कॉलेज मधील इ.५वी व ६ वीच्या विद्यार्थ्यांनी टेंभुर्णी मधील पोस्ट ऑफिस कार्यालयाला शैक्षणिक भेट दिली. विद्यार्थ्यांना पोस्ट ऑफिस मधील कार्यपद्धती,विविध योजनांची माहिती तसेच पोस्ट ऑफिस हे संपर्काचे किती महत्त्वाचे साधन आहे? याची सर्व माहिती विद्यार्थ्यांना देण्याच्या हेतूने या क्षेत्रभेटीचे आयोजन शाळेचे प्राचार्य श्रीकांत राऊत सर यांच्या मार्गदर्शनाखाली केले.
श्री माऊली शिक्षण संस्था विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाकडे लक्ष देत असते. विद्यार्थ्यांना कृतीयुक्त शिक्षणाचे सध्याची गरज ओळखून संस्थेने विद्यार्थ्यांच्या कृतियुक्त शिक्षणावरती भर दिला आहे समाजासाठी कार्यरत असणारी विविध शासकीय कार्यालयांची माहिती विद्यार्थ्यांना मिळावी यासाठी संस्थेमार्फत वेळोवेळी क्षेत्रभेटींचे आयोजन केले जाते.
      टेंभुर्णी पोस्ट ऑफिसचे पोस्ट मास्टर श्री अक्षय गव्हाणे सर, पोस्टल असिस्टंट शहाजी घळके सर, पोस्टमन पांडुरंग जाधव सर, संदीप हवालदार सर यांनी विद्यार्थ्यांना पोस्ट ऑफिस चे कार्य कसे चालते? पोस्ट ऑफिस मधील विविध योजना, पत्रांचे प्रकार, नवी-जुनी पत्रे, तिकिटांचे प्रकार तसेच पोस्ट ऑफिसचे सामाजिक महत्व विद्यार्थ्यांना समजावून सांगितले. 
                   या क्षेत्रभेटीचे संस्थेचे अध्यक्ष मा. योगेशजी (बाबाराजे) बोबडे, सचिवा शिवमती सूरजाताई बाोबडे यांनी कौतुक केले. दरम्यान इयत्ता पाचवीच्या वर्गशिक्षिका सौ. केचे मॅडम व इयत्ता सहावीच्या वर्गशिक्षिका सौ शहाणे मॅडम तसेच संस्थेचे समन्वयक मा. करळे सर व पीआरओ खुळे सर उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा