Breaking

बुधवार, २ नोव्हेंबर, २०२२

श्री गणपती फार्मसी महाविद्यालयामध्ये सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय एकता दिन उत्साहात साजरा



श्री गणपती फार्मसी महाविद्यालयामध्ये सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय एकता दिन उत्साहात साजरा


मौजे अकोले (खु), ता माढा येथील श्री गणपती फार्मसी महाविद्यालयांमध्ये लोहपुरुष भारतरत्न सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती राष्ट्रीय एकता दिन म्हणून साजरी करण्यात आली.या वेळी एकता दिनाचे औचित्य साधून विद्यार्थ्यांमध्ये एकता राहण्यासाठी त्यांनी राष्ट्रीय एकता दिवस शपथ घेतली. राष्ट्रीय एकात्मतेचे महत्त्व समजावे हे या कार्यक्रमाचे उद्दिष्ट होते. या कार्यक्रमाची सुरुवात सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रतिमा पूजनाने झाली. यावेळी बोलताना संस्थेचे सचिव म्हणाले की; सरदार वल्लभभाई पटेल हे स्वातंत्र्यलढ्यातील महत्त्वाचे योद्धे, दूरदर्शी राजकारणी, आदरणीय समाजसेवक होते. त्यांना भारताचे लोहपुरुष म्हणूनही ओळखले जाते. सरदार वल्लभभाई पटेल यांचे विचार समाजासाठी, युवकांसाठी, देशासाठी, आपल्या सर्वांसाठी प्रेरणादायी आहेत.जेव्हा जनता एक होते, तेव्हा अत्यंत क्रूर राजवटही त्यांच्यासमोर टिकू शकत नाही. त्यामुळे जात, धर्म, उच्च-नीच हा भेदभाव विसरून सर्वांनी एक व्हा हे सरदार वल्लभभाई पटेल यांचे विचार विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवले.
यावेळी संस्थेचे सचिव डॉ.आर.डी बेंदगुडे ,अध्यक्ष ॲड.विजयराव हिरवे, उपाध्यक्ष बाबा येडगे, प्राचार्या डॉ. रूपाली बेंदगुडे,प्रा.प्रशांत मिसाळ,प्रा.सुकुमार लांडे,प्रा.महादेवी भोसले,प्रा.केतकी पाटील,प्रा.कोमल यादव ,इतर शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा