न्यू इंग्लिश स्कूलच्या आदित्य मोरेची बुद्धिबळ स्पर्धेसाठी विभागीय पातळीवर निवड
कन्हेरगांव दि प्रतिनिधी ( धनंजय मोरे )
टेंभुर्णी येथील रयत शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिशमधील आदित्य पोपट मोरे यानी जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला. लोकमंगल इंग्लिश स्कूल, वडाळा येथे झालेल्या जिल्हास्तरीय १७ वर्षं वयोगटातून प्रथम क्रमांक मिळवून त्याची वालचंद कॉलेज सोलापूर यर्थे होणाऱ्या विभागीय पातळीवर निवड झाली.
आमदार संजयमामा शिंदे, धनंजय मोरे , चेअरमन लिंबाजी मोरे , माजी चेअरमन नागनाथ मोरे , मुख्याध्यापक एस. डी. लेंडवे , पर्यवेक्षक एस. के. शिंदे , क्रिडाशिक्षक आर. ए.बरबडे , एस . जी.बोराडे , एस. बी . मिरगणे , माजी संचालक गणेश माने यांनी अभिनंदन केले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा