Breaking

मंगळवार, ३१ जानेवारी, २०२३

सोलापूूर जिल्हा परिषद मधील मराठी माध्यमातील शिक्षक संवर्गाच्या बिंदू नामावली मधील मनमानी कारभारामुळे संभाजी ब्रिगेड आक्रमक*.सोलापूर प्रतिनिधी/सुशिला गायकवाड


*सोलापूूर जिल्हा परिषद मधील मराठी माध्यमातील शिक्षक संवर्गाच्या बिंदू नामावली मधील मनमानी कारभारामुळे संभाजी ब्रिगेड आक्रमक*.



सोलापूर प्रतिनिधी/सुशिला गायकवाड 
        दि.30/02/2023 सोलापूर. सोलापूर जिल्हा परिषदेच्या मराठी माध्यमातील शिक्षक संवर्गाची बिंदू नामावली तयार करताना खुला प्रवर्ग कर्मचारी महासंघाच्या प्रतिनिधींना आणि संभाजी ब्रिगेड,सोलापूर यांना विश्वासात न   घेतल्यामुळे संभाजी ब्रिगेड दि.06/02/2023 दिनी धरणे आंदोलन करणार आहे. 

सविस्तर वृत्त असे की गेल्या आठ महिन्यांपासून खुला प्रवर्ग कर्मचारी महासंघ आणि संभाजी ब्रिगेड यांच्या वतीने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, शिक्षण अधिकारी यांच्याशी अनेकवेळा  प्रत्यक्ष भेटी घेऊन तसेच वेळोवेळी निवेदने देऊन मराठी माध्यमातील शिक्षक संवर्गाच्या बिंदू नामावली मध्ये होत असलेल्या गैरकारभाराबद्दल माहिती देऊनही त्यावर कोणतीही कार्यवाही करण्यात आली नसल्याचे संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष श्री. सचिन जगताप यांनी सांगितले.

         गेल्या दोन वर्षांमध्ये जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये जवळपास 8000 विद्यार्थी संख्या वाढलेली आहे. शिक्षण विभागाच्या अशा बेजबाबदारपणामुळे सोलापूर जिल्ह्यात शिक्षकांची बहुतांश पदे रिक्त राहिली गेली परिणामी वाढलेल्या विद्यार्थ्यांचे अपुऱ्या शिक्षक संख्येमुळे अक्षम्य नुकसान झाले आहे. शिक्षण विभागाच्या मनमानी कारभारामुळे शेकडो शिक्षकांनी जिल्हाबदलीने स्वजिल्यात येणाच्या आशा सोडलेल्या आहेत.
          मा. शिक्षणाधिकारी साहेब, जि.प. सोलापूर यांनी 23/01/2023 च्या दोन वेगवेगळ्या पत्राद्वारे कन्नड आणि उर्दू माध्यमातील शिक्षक संवर्गाची बिंदू नामावली अद्ययावत करण्यासाठी संबंधित संवर्गातील शिक्षकांना उपस्थित राहण्याचे आदेश दिले. परंतु मराठी माध्यमातील शिक्षक संवर्गाची बिंदू नामावली अद्ययावत करण्यासाठी अशा प्रकारचे कोणतेही पत्र त्यांनी काढले नाही. याविषयी शिक्षणाधिकारी यांची प्रत्यक्ष भेट घेऊन याविषयीची विचारणा केली असता आम्ही आमच्या पद्धतीने बिंदू नामावली तयार करून मागासवर्ग कक्ष,पुणे यांना मंजुरीसाठी सादर करणार आहोत. तुम्ही तुमचे जे म्हणणे असेल ते मागासवर्ग कक्ष,पुणे येथे मांडा असे त्यांच्याकडून तोंडी सांगण्यात आले. यावरून नेमके काय समजायचे?   मा. शिक्षणाधिकारी साहेब यामध्ये आपले वैयक्तिक हितसंबंध जोपासतात? की त्यांच्यावर कोणाचा राजकीय दबाव आहे? की यामध्ये काही आर्थिक गैरव्यवहार झालेला आहे? अशा विविध प्रकारच्या चर्चा समाजमाध्यमातून होत आहेत. या सर्व प्रकरणाच्या सखोल चौकशीची मागणी संभाजी ब्रिगेड, जिल्हा सोलापूर यांनी आज दि.30/01/2023 रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच शिक्षणाधिकारी, जि.प. सोलापूर यांना दिलेल्या निवेदनातून केलेली आहेत.


       पुढील दोन दिवसांत संभाजी ब्रिगेडच्या निवेदनावर मा.मुख्य कार्यकारी अधिकारी आणि शिक्षण अधिकारी, जि.प.सोलापूर यांनी योग्य ती कार्यवाही न केल्यास संभाजी ब्रिगेड च्या वतीने दि 06/02/2023 दिवशी जिल्हा परिषदेच्या प्रांगणात बेमुदत आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष श्री. सचिन जगताप यांनी माध्यमांना दिली. यावेळी संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष सोमनाथ राऊत(सोलापूर विभाग), दिगंबर मिसाळ-तालुकाध्यक्ष माळशिरस, भारत लटके-तालुकाध्यक्ष माढा,राजाभाऊ पाटील-सरपंच केवड ई.उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा