पत्रकार हनुमंत पाटुळे यांना दर्पण सेवा गौरव पुरस्काराने सन्मानित.
प्रतिनिधी रुपेश डोलारे उस्मानाबाद.
कळंब दि.११, कळंब तालुक्यातील खामसवाडी येथील पत्रकार मा.हनुमंत पाटुळे यांना "दर्पण सेवा गौरव पुरस्कार" देण्यात आला.हा पुरस्कार सेवा पुरस्कार समीतीच्या वतीने दि.१०जानेवारी२०२३ रोजी श्री.संत ज्ञानेश्वर माऊली निराधार बालकाश्रम कळंब येथे देण्यात आला. गेल्या २५ वर्षापासुन हनुमंत पाटुळे हे सामाजिक कार्यकर्ते तसेच पत्रकार म्हणून तालुक्यात व जिल्ह्यात परिचित असुन सद्यस्थितीत दैनिक विकास धारा या वृत्तपत्राचे ते कळंब तालुका पत्रकार म्हणून कार्य करत आहेत. तसेच ते सामाजिक कार्यकर्ते ही असल्यामुळे त्यांनी समाजोपयोगी अनेक कामे केलेली आहेत. सद्यस्थीतीत ते मानवहित लोकशाही पक्षाचे उस्मानाबाद (जिल्हाध्यक्ष) म्हणुन ही आपले सामाजिक कार्य नेटाने व जोमाने पार पाडत आहेत. याच कार्याची दखल घेत सेवा पुरस्कार समीतीच्या वतीने "दर्पण सेवा गौरव पुरस्कार" (सामाजिक एकता)सन.(२०२३या वर्षांचा)जाहीर केला,आणि श्री.संत ज्ञानेश्वर माऊली निराधार बालकाश्रम कळंब येथे मान्यवर मा.श्री. मंगेशजी चिवटे (मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्ष महाराष्ट्र शासन), मा.श्री.अभय देशपांडे (राजकीय विश्लेषक मुंबई), निकिता पाटील (टी.व्ही.९ अँकर मुंबई), समिती प्रमुख मा.श्री.महादेव महाराज अडसूळ, मा.श्री. सुरेश टेकाळे, यांच्या हस्ते सत्कार करुन प्रदान करण्यात आला. या वेळी समीतीचे पदाधिकारी व पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.सदरील पुरस्कार मिळाल्याने हनुमंत पाटुळे यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा