श्रीगोंदा ग्रामीण रुग्णालयात "महाआरोग्य शिबीर"
श्रीगोंदा-नितीन रोही,
महाराष्ट्र शासन आणि सार्वजनिक आरोग्य विभागाच्या माध्यमातून 'संकल्प निरोगी महाराष्ट्राचा ' या योजनेतून ग्रामीण रूग्णालय श्रीगोंदा येथे "महाआरोग्य शिबीर"
संपन्न झाले...
याप्रसंगी तालुक्याचे आमदार बबनदादा पाचपुते यांच्या सौभाग्यवती डॉ.प्रतिभाताई पाचपुते यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने शिबिराचा प्रारंभ झाला, प्रमुख उपस्थित शहराच्या प्रथम नागरिक नगराध्यक्षा
सौ. शुभांगी ताई पोटे,
सौ.ज्योती ताई खेडकर (उपनगराध्यक्षा),राजेंद्र उकांडे,संतोष क्षीरसागर (नगरसेवक),नंदकुमार ताडे,(बाळासाहेबांची,शिवसेना तालुकप्रमुख, संदीप भोईटे,राजेंद्र पोकळे (प्रहार तालुका अध्यक्ष),दत्ताजी जगताप (दक्ष नागरिक फाऊंडेशन)यांच्या उपस्थितीत पार पडले.
शिबिरात ग्रामीण भागातील सर्व रुग्णांना सेवा देण्यासाठी डाॅ. गायकवाड,डॉ.सरोदे,डॉ. जांभळे,डॉ.विकास सोमवंशी,डॉ. उत्तम वडवकर,डॉ. आसिफ इनामदार,डॉ. खेंडके, यांनी रुग्णसेवा दिली. प्राचार्य डॉ. तापकिरे व डॉ. खामकर(तालुका आरोग्य अधिकारी)तसेच स्वामी विवेकानंद आयुर्वेद महाविद्यालय येथील प्रशिक्षणार्थी मोलाचे सहकार्य केले . शिबिराचे आयोजन रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक सौ.डॉ. सविता ससाणे, ग्रामीण रूग्णालयाचे अधिकारी डॉ. राजुळे,डॉ. सौ. इनामदार, डॉ. थोरात,डॉ.नवीन यादव,डॉ.अभिजित तिवाटणे,डॉ.विजय काळे,डॉ.सौ. जांजिरे व सर्व अधिकारी , कर्मचारी वृंद ग्रामीण रूग्णालय श्रीगोंदा यांनी केले. शिबिराचा तालुक्यातील ग्रामीण व शहरी भागातील रुग्णांना औषधोपचार व वैद्यकिय तपासणीचा मोठ्या प्रमाणावर लाभ मिळाला.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा