हनुमान यात्रा उत्सव समिती टेंभुर्णी अध्यक्षपदी श्री किशोर कर्ण देशमुख यांची निवड
टेंभुर्णी/प्रतिनिधी
चालू वर्षी सन 2023 - 24 या हनुमान यात्रा उत्सव समिती व कमिटी यांची बैठक मंगळवार दिनांक 21/3 /2023 रोजी संध्याकाळी 7 वाजता टेंभुर्णीचे ग्रामदैवत हनुमान देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष श्री डी के देशमुख सर यांच्या निवासस्थानी संपन्न झाली. यावेळी टेंभुर्णी देशमुख परिवारातील ज्येष्ठ व प्रमुख उपस्थित अध्यक्ष डी के देशमुख सर, सचिव शामराव नाना देशमुख, बंकट देशमुख सर, पंडित देशमुख गुरुजी, शिवसेना तालुकाप्रमुख मधुकर अण्णा देशमुख, गोरख बाप्पा देशमुख,ग्रामपंचायत सदस्य औदुंबर देशमुख , कल्याण पाटील संदीप देशमुख, राष्ट्रवादी युवक शहर अध्यक्ष ॲड मंगेश देशमुख, शशिकांत देशमुख,यांच्या प्रमुख उपस्थितीत चालू वर्षाची हनुमान यात्रा उत्सव समितीची निवड करण्यात आली नूतन पदाधिकारी खालील प्रमाणे अध्यक्ष किशोर कर्ण देशमुख, उपाध्यक्ष ज्योतीराम पाटील, खजिनदार मृणाल देशमुख,सचिव प्रदीप पाटील, कार्याध्यक्ष ॲड योगेश देशमुख, मिरवणूक प्रमुख वैभव देशमुख, सह खजिनदार अमोल देशमुख, सहसचिव अमित देशमुख,यांची सर्वानुमती निवड करण्यात आली यावेळी उपस्थितांमधून यात्रेची मिरवणूक,शोभेची दारू, कावड,लेझीम, कुस्त्याचे मैदान व इतर सांस्कृतिक कार्यक्रम सालाबाद प्रमाणे करण्याचे ठरले यावेळी उपस्थित ईश्वर देशमुख,विलास देशमुख,विजय देशमुख,प्रशांत देशमुख,अविनाश देशमुख,तुषार देशमुख, संभाजी देशमुख,आकाश देशमुख, दादा पाटील, सोमनाथ देशमुख, अमित पाटील,नितीन देशमुख, अनिकेत देशमुख,अमोल देशमुख, हनुमंत देशमुख,संतोष देशमुख,शिवाजी देशमुख,जयवंत देशमुख,सुरज देशमुख,सुग्रीव पाटील, समाधान पाटील,सागर पाटील,सोनाजी पाटील,विजय पाटील यांची उपस्थिती होती
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा