Breaking

शनिवार, २५ मार्च, २०२३

खंडणी आणि बंदिस्त करण्याच्या गुन्ह्यातून चौघांचा अटकपूर्व जामीन मंजूर*



*खंडणी आणि बंदिस्त करण्याच्या गुन्ह्यातून चौघांचा अटकपूर्व जामीन मंजूर*


टेंभुर्णी प्रतिनिधी /  खंडणी आणि बंदिस्त करण्याच्या गुन्ह्यातील आरोपी १) सुरज रणजीत शिंदे रा- टेंभुर्णी, ता- माढा २) समाधान रमेश कांबळे रा- टेंभुर्णी ता- माढा ३) सुदर्शन उर्फ दादा भारत लोंढे रा- माळेगाव, ता- माढा ४) आकाश भिमराव लोंढे रा.-चांदज, ता.- माढा या चार आरोपींचा बार्शी अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश मे. जे. सी. जगदाळे साहेब यांनी अटकपूर्व जामीन मंजूर केला ‍.    


ॲड. एम.ए.कदम रा.- कंदर, ता.करमाळा 


    यात हकीकत अशी की दिनांक १०/११/२०२२ रोजी रात्री ०९.३० वाजता अकलूज ते टेंभुर्णी रोडवर शेवरे गावच्या शिवारात कॅनलच्या पुढील बाजूस जनावरांनी भरलेला आयशर टेम्पोला एक मोटारसायकल आडवी लावून मोटरसायकलवरील आरोपींपैकी दोघांनी उभा केला आणि गाडीच्या ड्रायव्हरला हाताने मारहाण करून त्याचा मोबाईल काढून घेतला व तुझ्या जवळ किती पैसे आहेत असे विचारून पैसे नाहीत असे म्हटल्यावर ड्रायव्हरला गाडीत बसवले व त्याच्याबरोबर वरीलपैकी एकजण गाडीत बसला व मोटरसायकल पुढे चालली आणि त्यामागे टेम्पो घेऊन ड्रायव्हरला येण्यास सांगितले. गाडीत बसलेल्या एकाने कोणालातरी फोन लावला आणि गाडी धरली आहे असे सांगितले. कॅनलने पूर्वेस चार ते पाच किलोमीटर गेल्यावर ड्रायव्हरचा फोन त्याला दिला आणि गाडीच्या मालकाला फोन करायला सांगितले. नंतर ड्रायव्हरने गाडीचे मालक सैफ अली कुरेशी रा.- अकलूज, ता.- माळशिरस यांना फोन लावला असता व ते लोक दोन लाख रुपये मागत असलेले सांगितले असता मालकाचे त्यांचेसी बोलणे झाले आणि पैसे देण्यास नकार दिल्याने त्यांनी ड्रायव्हर जवळ असलेले चार हजार पाचशे रुपये काढून घेऊन गाडीतील पाच जर्सी वासरे काढून घेतली. 

नंतर दिनांक ११/१२/२०२२ रोजी पहाटे पाच वाजताचे सुमारास पुन्हा मालकाला फोन लावून अगोदर 40 हजार रुपये दे असे म्हणाले. मालक नाही म्हणल्यावर तीस हजार दे असे म्हणू लागले. मालक पैसे देण्यास नकार दिल्यानंतर त्यांनी लोंढे पत्रकाराला बोलावून घेतले आणि तिघांनी गाडी वडवली चौकात घेण्यास सांगितले. लोंढे पत्रकार (नाव माहित नाही) म्हनाला की काहीतरी देऊन घेऊन मिटवून टाका कशाला पोलीस स्टेशनला जातो मी त्यांना पैसे कमी घ्यायला लावतो. नंतर त्याला वरील आरोपींची नावे माहीत झाली. अशी फिर्याद आयशर टेम्पोचा ड्रायव्हर चांद काशीम मुलाणी वय वर्ष 24 रा.- माळेवाडी अकलूज, ता.- माळशिरस यांने अशी फिर्याद दिली. 
         

ॲड. एस. के. लोणकर रा. टेंभुर्णी, ता- माढा


                             सदरचे आरोपी ॲड. एम. ए. कदम यांचे मार्फत मे. जिल्हा व सत्र न्यायालय बार्शी येथे जामीन अर्ज दाखल केला असता. मे. न्यायालयाने तपासी अंमलदार टेंभुर्णी पोलीस स्टेशन यांना बोलावून घेऊन अंतिम सुनावणी घेऊन आरोपींचे वकिलांचा युक्तिवाद ग्राह्य धरून आरोपीस सशर्त जामीन मंजूर केला. या कामी आरोपी तर्फे ॲड. एम.ए.कदम रा.- कंदर, तालुका- करमाळा जि . सोलापूर व ॲड. एस. के. लोणकर रा- टेंभुर्णी, ता- माढा यांनी काम पाहिले तर सरकार पक्षातर्फे ॲड.बोचरे सो यांनी काम पाहिले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा