Breaking

मंगळवार, २८ मार्च, २०२३

सावंत बंधूच्या माध्यमातून वडोली साठी भरघोस निधी*




*सावंत बंधूच्या माध्यमातून  वडोली साठी भरघोस निधी*


  टेंभुर्णी प्रतिनिधी/   माढा तालुक्यातील वडोली येथील वडोली गावचे नेते तानाजीभैया गाडे पाटील यांनी आरोग्य मंत्री प्रा डॉक्टर तानाजीराव सावंत व जिल्हा नियोजन समिती सदस्य प्रा शिवाजीराव सावंत यांच्या माध्यमातून समाज कल्याण विभाग जिल्हा परिषद निधीतून ३० लाखाचा निधी आणून गावाच्या विकासात भर टाकल्याने त्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे 
      वडोली हे गाव भीमा नदी काठावर वसले असून या गावाचा समावेश हा कोंढार भागामध्ये होतो तालुक्याच्या ठिकाणापासून कोसोदूर असल्याने व लोकसंख्या कमी असल्याने वडोली गावाला तानाजीभैय्या गाडे पाटील यांच्या माध्यमातून सर्वसमावेशक सर्वांना सोबत घेऊन जाणारे होतकरू युवा नेतृत्व लाभल्याने त्यांनी मागील पाच वर्षात अनेक योजना खेचून आणून वडोली गावाच्या विकासात भर टाकली आहे
         अशातच त्यांनी सन 2022-23 या वर्षात सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रा डॉक्टर तानाजीराव सावंत व जिल्हा नियोजन समिती सदस्य प्रा.शिवाजीराव सावंत यांच्या नेतृत्वाखाली वडोली गावातील दलीतवस्ती साठी, लोकरे वस्ती बागाव वस्ती भाग्यवंत वस्ती लक्ष्मी वस्ती बुद्ध चाळ व रोहिदास पेठ या भागासाठी काँक्रीटीकरण पेव्हर ब्लॉकसाठी 30 लाखाचा निधी जिल्हा परिषदेतून आणल्याने वाड्या वस्तीवरील लोकांमध्ये आनंदाचे वातावरण असून तानाजीभैया गाडे पाटील यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा