माढा तालुक्यातील रस्ते ,वीज ,पाणी व मूलभूत समस्या सोडवण्यास सदैव तयार...
आ. रणजितसिंह मोहिते-पाटील
बेंबळे ।प्रतिनिधी
माढा तालुक्यातील रस्ते, वीज, पाणी व ग्रामीण भागातील इतर सार्वजनिक मूलभूत समस्या अडचणी सोडवण्यासाठी वरिष्ठ पातळीवरून आपण नेहमीप्रमाणे सदैव सहकार्य करण्यास तयार आहोत अशी ग्वाही विधान परिषद सदस्य आमदार रणजीतसिंह मोहिते पाटील यांनी हरिनगर- बेंबळे येथे कार्यकर्त्यांच्या बैठकीत दिली आहे.
देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या कार्यकालास नऊ वर्ष पूर्ण झाल्याबद्दल ग्रामीण भागातील लोकप्रतिनिधी व कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन चर्चा करावी ,व समस्या निवारण व्हाव्यात यासाठी केंद्र व राज्य सरकार मार्फत मोदी @9 हे अभियान सर्वत्र राबवले जात आहे .हरीनगर- बेंबळे येथील प्रोग्रेसिव्ह इंग्लिश स्कूलमध्ये आयोजित केलेल्या मोदी @ 9 संपर्क अभियान व टिफिन बैठक प्रसंगी आमदार मोहिते पाटील बोलत होते .या अभियान बैठकीस समाज कल्याणचे माजी सभापती शिवाजी कांबळे पोपट अनपट भारत पाटील बेंबळे सरपंच विजय पवार दीपक भोसले जयसिंग ढवळे टेंभुर्णीचे सुधीर महाडिक बलभीम लोंढे सुभाष इंदलकर विजय कोकाटे राहुल कुलकर्णी अशोक देवकर अशोक काळे हनुमंत अनपट, समाधान अनपट, समाधान भोसले रमाकांत बनसोडे ,केशव गायकवाड राजेंद्र जगताप अमोल मस्के विठ्ठल मस्के सुभाष पाटील सोमनाथ गायकवाड राहुल चव्हाण अविनाश धोत्रे गोविंद पवार सत्यवान केचे रामभाऊ केचे आदी मान्यवरा सह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते. सर्वप्रथम आमदार रणजीत सिंह मोहिते पाटील यांचे प्रोग्रेसिव्ह प्रशालेत आगमन होताच पोपट अनपट शिवाजी कांबळे व सर्व कार्यकर्त्यांनी स्वागत केले. यानंतर सर्वांबरोबर चर्चा करीत टिफिन स्नेहभोजन कार्यक्रम संपन्न झाला. कार्यकर्त्याबरोबर खेळीमेळीच्या वातावरणात गप्पा मारून चर्चा करत असताना, अनेक गावातील रस्ते ,वीज ,पाणी ,दूध व्यवसाय आदी प्रकारच्या समस्या कार्यकर्त्यांनी सांगितल्या, आमदार मोहिते पाटील यांनी कांही अडचणी जागेवरून फोन करूनच ज्या त्या अधिकाऱ्यांना आदेश देऊन अडचणी दूर करण्यास सांगितले . कार्यकर्त्यांना उद्देशून बोलताना आ. रणजीत सिंह मोहिते पाटील म्हणाले की यापुढे ग्राम सडक योजना रस्ते, पाणंद रस्ते, विद्युत ट्रान्सफॉर्मर्स, शैक्षणिक सुविधा, पाणीपुरवठा योजना, आरोग्य सेवा या व इतर सर्व सार्वजनिक समस्या साठी प्रत्येक जिल्हा परिषद गटातील प्रत्येक गावात कार्यकर्त्यांनी जाऊन तेथील मुलभूत समस्या जाणून घ्या व रीतसरपणे ठराव करून माझ्याकडे पाठवून द्या, मी वरिष्ठ पातळीवरून या समस्या निश्चित सोडवण्याचा प्रयत्न करेन. विशेष म्हणजे या अभियान बैठकी प्रसंगी फटाके, वाद्य वाजवणे, हार- तुरे, सत्कार समारंभ आदी सर्व बाबीस फाटा देण्यात आला होता. बेंबळे -हरीनगर माळेगाव टेंभुर्णी भोसलेवाडी अकोले घोटी भोईजे आहेरगाव अकोले खुर्द माळेगाव मिटकलवाडी ,अरण, मोडनिंब, आहेरगाव व परिसरातील अनेक कार्यकर्ते याप्रसंगी उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा