*जलसंधारण मंजूर कामांवरील स्थगिती अखेर उठली. -आ.बबनराव शिंदे
*शेती व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागणार.
बेंबळे।प्रतिनिधी।
माढा विधानसभा मतदारसंघातील माढा व पंढरपूर तालुक्यातील महाराष्ट्र जलसंधारण महामंडळाकडील कामांना मे-जून,2022 या वर्षात 15 कोटी 34 लाख इतक्या रक्कमेच्या कामास प्रशासकीय मान्यता मिळालेली होती. परंतू राज्यात सत्तांतर झाल्याने मंजूर कामांना स्थगिती देण्यात आली. अखेर या मंजूर कामांवरील स्थगिती शासन आदेशानुसार उठली असल्याची माहिती आ.बबनराव शिंदे यांनी दिली.
अधिक माहिती आ.शिंदे म्हणाले की, माढा मतदारसंघातील माढा व पंढरपूर तालुक्यातील काही भाग आवर्षण प्रवण क्षेत्रात येत आहे, त्या ठिकाणी पाण्याची भीषण टंचाई आहे. महाराष्ट्र जलसंधारण महामंडळ अतंर्गत 12 जलसंधारण कामांना मे-जून, 2022 या वर्षात प्रशासकीय मान्यता मिळाली होती. परंतू जलसंधारणांच्या कामांना स्थगिती देण्यात आली होती. नुकतेच पुरवणी अर्थसंकल्पीय अधिवेशनात राज्याचे उपमुख्यमंत्री ना.अजितदादा पवार यांचेकडे प्रत्यक्ष भेटून पत्राव्दारे पाठपुरावा करणेत आला. त्यानुसार माढा विधानसभा मतदारसंघातील 15 कोटी 34 लाख इतक्या रक्कमेची जलसंधारण कामावरील स्थगिती दि.31-07-2023 रोजीच्या शासन आदेशानुसार उठली आहे. जलसंधारण कामांतर्गत रुपांतरीत साठवण तलाव, गेटेड चेक डॅम, साठवण बंधारा व इतर कामांचा समावेश आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्याचा व शेतीच्या सिंचनाचा प्रश्न मार्गी लागणार असल्याची माहिती आ.शिंदे यांनी दिली.
*माढा मतदारसंघातील जलसंधारणाची होणार कामे*.
*माढा तालुका* - (1) वडाचीवाडी रुपांतरीत साठवण तलाव - रक्कम रु. 4,28,46,018 , (2) पालवण रुपांतरीत साठवण तलाव - रक्कम रु.3,50,21,423 (3)चव्हाणवाडी क्रं.1 गेटेड चेक डॅम - रक्कम रु.1,14,16,675, (4) चव्हाणवाडी क्रं.2 गेटेड चेक डॅम - रक्कम रु.1,35,27,221, (5) चव्हाणवाडी क्रं.3 गेटेड चेक डॅम - रक्कम रु.1,30,12,167, (6) चव्हाणवाडी क्रं.4 (अरुण सदाशिव चव्हाण गट नं.136) गेटेड चेक डॅम - रक्कम रु. 44,86,190
*पंढरपूर तालुका* - (1) वाडीकुरोली गेटेड साठवण बंधारा.- रक्कम रु. 90,80,866, (2) व्होळे क्रं. 1 साठवण बंधारा- रक्कम रु. 65,73,703, (3) व्होळे क्रं. 2 साठवण बंधारा- रक्कम रु. 65,74,204 (4) भोसे (क) सटवाई मळा, गेटेड चेक डॅम - रक्कम रु. 42,65,182 (5) मेंढापूर क्रं.1 गेटेड चेक डॅम - रक्कम रु. 32,93,467 (6) मेंढापूर क्रं.2 गेटेड चेक डॅम - रक्कम रु. 33,06,371.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा