मतदार संघातील पाच हजार "आराधी" भाविकांना मोफत तुळजापूर यात्रा घडवणार.... आ. बबनदादा शिंदे
बेंबळे। प्रतिनिधी।
माढा विधानसभा मतदारसंघातील पाच ते सहा हजार 'आराधी' भाविकांना कुलस्वामिनी तुळजाभवानी मातेचे, मोफत एसटी प्रवासाने दर्शन घडवून आणण्याचा संकल्प आ. बबनदादा शिंदे व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ सुनंदाताई बबनराव शिंदे यांनी केला आहे. विशेष माहिती अशी की ज्या घरात तुळजाभवानी मातेची 'परडी,पोत व कवड्यांची माळ' असेल त्याच घरातील प्रमुख स्त्री किंवा पुरुष आराधी व्यक्तीस या मोफत तुळजापूर यात्रेचा लाभ घेता येणार आहे.
पहिल्या ट्रिप मध्ये बारा गावातील सातशे आराधी भाविकांना 14 एसटी बस गाड्यातून शुक्रवारी, दिनांक 29 सप्टेंबर रोजी, पौर्णिमेच्या दिवशी तुळजापूरला जगदंबामातेच्या दर्शनाचा लाभ मिळाला असून या मध्ये 650 महिला व 50 पुरुष आराधी भावीकांचा समावेश होता. शनिवार दिनांक 30 सप्टेंबर पासून पितृपक्ष (महाळ) पंधरवाडा सुरू होत असल्यामुळे या यापुढे अश्विन महिन्यात 15 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या , घटस्थापनेनंतर ,मतदार संघातील उर्वरित गावातील आराधी भाविकांना मोफत तुळजापूर यात्रा व भवानी मातेच्या दर्शनाचा निश्चित लाभ मिळणार आहे व याचे नियोजन गावोगावी कळवण्यात येईल असे शेती खात्यातील अधिकारी बाबासाहेब मुलाणी यांनी सांगितले .
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा