Breaking

मंगळवार, १० ऑक्टोबर, २०२३

हरंगुळ (लातूर) ते पुणे नव्याने सुरू झालेल्या रेल्वेचे सोलापूर जिल्हा प्रवाशी संघटनेच्या वतीने कुर्डुवाडीत उत्साहात स्वागत...*



*हरंगुळ (लातूर) ते पुणे नव्याने सुरू झालेल्या रेल्वेचे सोलापूर जिल्हा प्रवाशी संघटनेच्या वतीने कुर्डुवाडीत उत्साहात स्वागत...*




     *लातूर मार्गावर नवीन गाडी सुरू झाल्याने पुणे ते लातूर दरम्यान पहिल्याच दिवशी गाडी हाऊसफुल्ल...*
   *सोलापूर जिल्हा प्रवाशी संघटनेच्या वतीने रेल्वे प्रशासनाचे अभिनंदन आणि आभार...*



 प्रतिनिधी (पत्रकार) कुर्डुवाडी
कुर्डुवाडी: आजपासून नव्याने हरंगुळ लातूर ते पुणे दरम्यान नव्याने सुरू झालेल्या रेल्वेचे सोलापूर जिल्हा प्रवाशी संघटनेच्या वतीने कुर्डुवाडी स्थानिकात जल्लोषात स्वागत करण्यात आले.
   सोलापूर जिल्हा प्रवाशी संघटनेचे कार्याध्यक्ष व ज्येष्ठ पत्रकार अरुण कोरे यांच्या हस्ते गाडीच्या इंजीन समोर श्रफळ वाढवून स्वागत करण्यात आले.याचवेळी पहिल्या दिवशी गाडी घेऊन आलेले लोकोपायलट बी.के.घाडगे यांचे संघटनेचे अध्यक्ष हर्षद मोरे यांनी पुष्पहार घालून व सहाय्यक लोकोपायलट दत्ता गोरे यांचे रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य प्रा.डॉ.आषिश रजपूत यांच्या हस्ते पुष्पहार घालून स्वागत करण्यात आले.
     याप्रसंगी रेल्वेचे मुख्य वाणिज्य निरीक्षक भानवसे साहेब,माजी विभागीय रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य,पत्रकार विनायक पाटील, रेल्वे सुरक्षा दलाचे खारे, उद्योजक महेश लाडे,ऋतीक आडगळे, ज्येष्ठ पत्रकार अरुण कोरे आदी मान्यवर उपस्थित होते.
     पुणे-लातूर मार्गावर कुर्डुवाडी मार्गे सकाळी सात पासून रात्री साडे दहा पर्यंत चौदा तास गाडी नसल्याने प्रवाशांची फारच गैरसोय होत होती.ती दूर करण्यासाठी सोलापूर जिल्हा प्रवाशी संघटनेच्या वतीने रेल्वेकडे सातत्याने मागणी करण्यात येत होती.मिरज, पंढरपूरहून येणा-या प्रवाशांचीही या नवीन गाडीमुळे प्रवाशांची गैरसोय दूर केल्या बद्दल रेल्वे प्रशासनाचे प्रवाशी संघटनेच्या वतीने आभार मानून धन्यवाद दिले आहेत.उस्मानाबादहून तुळजापूर येथे जाण्यासाठी भक्तांचीही सोय झाली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा