*माजी विद्यार्थिनी सौ.शोभा इंगवले-पाटील यांची नूतन विद्यालयास एक लाख अकरा हजार रुपयाची देणगी....*
*"ग्रीन वर्ल्ड"च्या प्राईड ऑफ इंडिया बध्दल यशस्वी मराठी उद्योजक बाळासाहेब इंगवले-पाटील यांचाही सन्मान....*
अरुण कोरे प्रतिनिधी कुर्डुवाडी.
कुर्डुवाडी प्रतिनिधी, कुर्डुवाडीतील विद्यार्थीप्रिय नूतन विद्यालयास या विद्यालयाच्या माजी विद्यार्थिनी व प्राचार्य सौ.शोभा इंगवले पाटील यांनी एक लाख अकरा हजार एकशे अकरा रुपयांच्या देणगीचा चेक संस्थेचे चेअरमन प्रभाकर चिंचवडकर सर यांना सुपूर्द केला.
याप्रसंगी विद्यालयाचे मुख्याध्यापक लक्ष्मीकांत डंके सुपरवायझर यादव सर,,कन्हेरे सर,उद्योजक बाळासाहेब इंगवले-पाटील, ज्येष्ठ पत्रकार अरुण कोरे,श्री.कुलकर्णीसर,सौ.कुलकर्णी मॅडम आदी उपस्थित होते.
या छोटेखानी समारंभात प्रसिद्ध मराठी उद्योजक प्राचार्य डॉ.बाळासाहेब इंगवले-पाटील यांना "ग्रीन वर्ल्ड" चा "प्राईड ऑफ इंडिया" पुरस्कार मिळाल्याबद्दल शिक्षण प्रसारक मंडळाचे चेअरमन प्रभाकर चिंचवडकर सर यांच्या हस्ते सपत्नीक सत्कार करण्यात आला.
शालेय जीवनात आपण आयुष्यातील एक महत्त्वाच्या टप्प्यावर मार्गक्रमण करत असतो.याच काळात आपल्याला महाविद्यालयातील गुरुजनांचे मार्गदर्शन व संस्कार मिळतात व तेच आपणास आयुष्यभर उपयोगी पडतात.त्या ऋणातून मुक्त होणं शक्य नसते पण त्याची उतराई व्हावी म्हणून मी देणगी दिल्याचे या प्रसंगी माजी विद्यार्थिनी व प्राचार्य डॉ.शोभा इंगवले पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
प्रभाकर चिंचवडकर सर यांनी डॉ.इंगवले पाटील यांच्या शिक्षक ते प्रसिद्ध उद्योजक म्हणून केलेल्या यशस्वी भरारी बध्दल व त्यांना मिळालेल्या पुरस्कारांबध्दल गौरवोद्गार काढून देणगीदारांचे आभार मानले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा