Breaking

बुधवार, २६ जून, २०२४

टेंभुर्णी येथे पान शॉप चालक महाडिक यास लोखंडी रॉडने मारहाण एकावर गुन्हा दाखल*



*टेंभुर्णी येथे पान शॉप चालक महाडिक यास लोखंडी रॉडने मारहाण एकावर गुन्हा दाखल*
टेंभुर्णी प्रतिनिधी:-
टेंभुर्णी येथील कुर्डूवाडी ब्रिज जवळ असलेले पान शॉप दुकानदार सागर महाडिक यास लोखंडी रॉडने मारहाण करून जखमी केले प्रकरणी टेंभुर्णी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल 

याबाबत टेंभुर्णी पोलीसांकडून मिळालेली माहिती अशी की फिर्यादी सागर नरहरी महाडिक वय 27 वर्ष धंदा पान शॉप राहणार महाडिक वस्ती टेंभुर्णी तालुका माढा हे आपल्या टेंभुर्णी कुर्डूवाडी रोड वर असलेल्या कुर्डूवाडी ब्रिज जवळ  वैष्णवी पान शॉप  टेंभुर्णी येथे दुकानात असताना मंगळवार 
 दि. 25/ 6 /2024 रोजी सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास तेथे आरोपी स्वप्नील नागनाथ कुबेर हे पान दुकानासमोर  त्याची बुलेट गाडी घेऊन आला व त्याने बुलेट गाडीची जोराने जोराने रेस पान दुकानासमोर केली असता त्यास फिर्यादी सागर महाडिक बुलेट गाडीची रेस का करतो अशी विचारणा केली असता सदर फिर्यादीस 
आरोपी स्वप्निल नागनाथ कुबेर राहणार सापटणे टें तालुका माढा याने फिर्यादीस शिवीगाळ केली व परत थोड्यावेळाने फिर्यादीच्या पान दुकानासमोर येऊन शिवीगाळ केली व लोखंडी रॉड ने फिर्यादीच्या उजव्या हातावर मारून गंभीर जखमी केले आहे..

याबाबत स्वतः फिर्यादी सागर नरहरी महाडिक यांनी स्वतः टेंभुर्णी पोलीस स्टेशन येथे सदर आरोपी तक्रार दाखल केली आहे सदर आरोपी विरोधात टेंभुर्णी पोलीस स्टेशन येथे 326, 323, 504, 506 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे याबाबत टेंभुर्णी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दीपक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कॉन्स्टेबल अलीम शेख  पुढील तपास करीत आहेत..

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा