*मातंग समाजातील युवकाचा खून करणा-या आरोपींवर कारवाई करा - रामभाऊ वाघमारे*
प्रतिनिधी टेंभुर्णी.... भारत जगताप टेंभुर्णी
*******************
सोलापूर जिल्ह्यातील महुद तालुका सांगोला येथील मातंग समाजातील युवक सुनील कांबळे यांचा निघुर्ण पणे खून करण्यात आला असून या या घटनेचा निषेध करून खून करणाऱ्या आरोपीला तात्काळ अटक करून त्यांचेवर कायदेशीर कारवाई करावी व फाशीची शिक्षा देण्यात यावी अशा मागणीचे निवेदन मातंग एकता आंदोलन सोलापूर जिल्हाच्या वतीने टेंभुर्णी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दीपक पाटील यांना निवेदन देण्यात आले आहे.
या वेळी मातंग एकता आंदोलन संघटनेचे जिल्हाध्यक्ष रामभाऊ वाघमारे,सतीश जगताप, विशाल जगताप, रवी खंदारे, शुभम जगताप, रंजीत जगताप, अण्णा जगताप,विलास आरडे सोना जगताप, आदीउपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा