*टेंभुर्णी येथे देशमुख-पाटील शाहीविवाह सोहळा दिमाखात संपन्न*
*या विवाह सोहळ्यास राज्यभरातून दिग्गजांची हजेरी*
टेंभुर्णी-राष्ट्रवादी युवक काँग्रेस पक्ष (श.प) सोलापूर ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष सुरज बाळासाहेब देशमुख व डाॅ.श्रेया विपीन पाटील यांचा शाही सोहळा रविवारी दिनांक 20 एप्रिल 2025 रोजी सांय 7 वा 47 मि श्री शारदेय गुरुकुल पब्लिक स्कूल,टेंभुर्णी येथे दिमाखात संपन्न झाला.
या शाहीविवाह सोहळ्यासाठी 50 हजारांहून अधिक लोकांची गर्दी पाहायला मिळाली. यावेळी संपूर्ण टेंभुर्णी शहरातून वेगवेगळ्या राज्यातील बॅन्ड पथकाच्या संगीताने सुरज देशमुख यांच्या विवाह सोहळ्याची वरात काढण्यात आली होती, यावेळी वरातीमध्ये डीजे ऐवजी पारंपरिक वाद्यांना महत्त्व देण्यात आले.या वरातीसाठी 10 हजारांहून अधिक लोक उपस्थित होते. अतिशय नियोजनबद्ध हा शाहीविवाह सोहळा पार पडला. नयनरम्य आतिषबाजी,गंगा आरती,महाराष्ट्रात प्रथमच भव्य उभारण्यात आलेल्या विवाह मंचावरील थ्रीडी रिफ्लेक्शन्स या विवाह सोहळ्याचे आकर्षण ठरले.
या शाहीविवाह सोहळ्यासाठी
राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील,राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (श.प) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आ.जयंत पाटील,राज्याचे क्रीडामंत्री ना.दत्तात्रय भरणे,आ.रणजितसिंह मोहिते-पाटील व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ.सत्यप्रभादेवी मोहिते-पाटील,संभाजीनगरचे खासदार संदिपान भुमरे,बीडचे खासदार बजरंग सोनवणे,खा.धैर्यशील मोहिते-पाटील,माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील,महाराष्ट्र सहकारी परिषदेचे अध्यक्ष राजन पाटील,आ.अभिजीत पाटील,आ.कैलास पाटील,आ.नारायण पाटील,आ.बाबासाहेब देशमुख,आ.संदिप क्षीरसागर,आ.विक्रम पाचपुते,आ.प्रवीण स्वामी,आ.प्रकाश भरसाखळे,आ.हरिश पिंपळे,माजी राज्यमंत्रि प्राजक्त तनपुरे,माजी आमदार धनाजी साठे,माजी आमदार विनायक पाटील,माजी आमदार संजयमामा शिंदे,मंत्री मकरंद पाटील यांच्या सौभाग्यवती सौ.अर्चना पाटील,माजी आमदार राहुल मोटे,इंदापूर तालुक्याचे नेते अप्पासाहेब जगदाळे,संभाजीनगर जिल्हा दुध संघाचे अध्यक्ष नंदू काळे,जिल्हा दुध संघाचे माजी अध्यक्ष मनोहर डोंगरे,युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख,डाॅ. एमके इनामदार,राज्य प्रवक्ते उमेश पाटील,युवती अध्यक्षा सक्षणा सलगर,पुणे जिल्हा परिषदेचे माजी सभापती प्रवीण माने,पुणे जिल्हा मध्यवर्ती बॅकेचे संचालक भालचंद्र जगताप,मल्लसम्राट रावसाहेब मगर,विलासराव घुमरे सर,धाराशिव काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष धीरज पाटील,पंढरपूरचे युवा नेते प्रणव परिचारक,सांगोलाचे नेते बाबुराव गायकवाड,भैरवनाथ शुगरचे व्हाईस चेअरमन अनिल सावंत,बारामती ॲग्रोचे व्हाईस चेअरमन सुभाष गुळवे,शिवसेना जिल्हाप्रमुख धनंजय डिकोळे,प्रदिप जगदाळे,उद्योजक उत्तम फडतरे,वाशी तालुक्याचे नेते प्रशांत चेडे-पाटील,माढा पंचायत समितीचे माजी सदस्य धनराज शिंदे,वाकावचे सरपंच ऋतुराज सावंत,फॅबटेकचे सचिन जाधव,देशमुख परिवाराचे जावई
नागपूर शहरचे आरटीओ अधिकारी संतोष काटकर,केंद्रीय ग्रामविकास खात्याचे खासगी सचिव स्वप्नील पाटील,संभाजीनगर शहरचे सहाय्यक पोलीस आयुक्त धनंजय पाटील,यांच्यासह आयकर विभागाचे कमिशनर अभय फाळके,आयकर उपायुक्त बाळासाहेब देशमुख,सोलापूर महागरपलिका आयुक्त डाॅ.सचिन ओम्बासे,मुख्यमंत्री कार्यालयाचे खासगी सचिव कृष्णा पाटील,उपविभागीय अधिकारी अभयसिंह मोहिते,इस्लामपूरचे पोलीस उपअधीक्षक मंगेश चव्हाण,तुळजापूरच्या तहसीलदार माया माने,इंदापूरचे पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे,टेंभुर्णीचे पोलीस निरीक्षक नारायण पवार यांच्यासह PWD(अमरावती,पुणे,नाशिक,मराठवाडा विभागातील),MSIDC,MSRDC,PMGSY,NH,NHAI,MIDC,नगरपालिका वरील सर्व विभागातील वरिष्ठ अधिकारी,नामांकित कंपनीचे डीलर,शासकीय ठेकेदार,
राज्यातील मान्यवर व उच्चपदस्थ अधिकारी उपस्थित होते.मान्यवराचे स्वागत देशमुख परिवाराच्या वतीने मे.देशमुख आणि कंपनीचे सर्वेसर्वा बाळासाहेब देशमुख,रावसाहेब देशमुख,हर्षवर्धन देशमुख यांनी केले,तर पाटील परिवाराच्या वतीने विपीन पाटील,ॲड.विजयानंद पाटील यांनी केले.हा शाहीविवाह सोहळा दिमाखात संपन्न होण्यासाठी नाना-भैय्या युवा मंच,मे.देशमुख आणि कंपनी स्टाप,बालासन्स कंपनी ऑफिस पुणे स्टाप,शारदेय गुरुकुल पब्लिक स्कूल स्टाप यांनी परिश्रम घेतले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा