सोलापूर ( प्रतिनिधी ) श्रीकांत सुरते ( फक्त AJ साठी)
पोलिसांच्या गोळीबारात ठार
सोलापूर: पुणे पोलिसाच्या गुन्हे शाखेने केलेल्या गोळीबारात एका कुख्यात गुन्हेगारास ठार मारण्यात आले आहे. ही घटना सोलापूर पुणे महामार्गावरील मोहोळजवळ घडली.याबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, पुण्यातील काळेवाडी पोलीस स्टेशन परिसरात अनेक गुन्ह्यांमध्ये फरार असलेला शाहरुख रहीम शेख (रा.हडपसर, पुणे ) हा सोलापूर -पुणे महामार्गावरील लांबोटी येथील नरोटे वस्ती येथे राहत असल्याची माहिती पुणे क्राईम ब्रँच यांना मिळाली होती, त्यानुसार पोलिसांनी त्यांनी रात्री घटनास्थळी सापळा रचून आरोपीला ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला असता आरोपीने पोलिसांवर पिस्टलमधून प्रारंभी पोलीसांवर फायर केले. यावेळी स्वसंरक्षणार्थ पोलिसांनी केलेल्या गोळीबारात त्याचा मृत्यू झाला आहे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा