Breaking

शुक्रवार, १७ जुलै, २०२०

*बबनरावजी शिंदे उच्च माध्यमिक एच .एस .सी. परीक्षेत आर्टस व सायन्स चा निकाल 100%*


*बबनरावजी शिंदे उच्च माध्यमिक एच .एस .सी. परीक्षेत आर्टस व सायन्स चा निकाल 100%*

***  *टेंभुर्णी[ प्रतिनिधी ]* *****

टेंभुर्णी [ प्रतिनिधी ]  अकोले ( खुर्द ) येथील मा . बबनरावजी शिंदे उच्च माध्यमिक विद्यालय एच .एस.सी. बोर्ड परीक्षेत जिल्ह्यात अव्वल ... उज्ज्वल यशाची परंपरा कायम
आर्टस् व सायन्स शाखा १०० % निकाल .लागला आहे 
सायन्स शाखेत कु . फुंदे वैष्णवी शंकर हिने ९२ % गुण मिळवून माढा तालुका उज्वल यश मिळवले आहे आकोले (खुर्द ) येथील  बबनरावजी शिंदे माध्य . व कला, विज्ञान उच्च माध्यमिक विद्यालयाने नुकत्याच जाहीर झालेल्या एच.एस.सी. बोर्ड परीक्षेत उज्ज्वल यशाची परंपरा कायम राखत  अव्वल यश मिळविले आहे .फेब्रुवारी / मार्च २०२० एच .एस.सी. बोर्ड परीक्षेत आर्टस् ६२ व सायन्स१७६ विद्यार्थी असे एकूण २३८ विद्यार्थी परीक्षेस प्रवीष्ट झाले होते . दोन्ही शाखेचा निकाल १०० % लागला असून ६४ विद्यार्थी डिस्टिंगशनमध्ये , १४० विद्यार्थी फस्ट क्लासमध्ये व ३४ विद्यार्थी सेकंड क्लास मध्ये उत्तीर्ण झाले आहेत .
विद्यालयातील शाखा निहाय पहिले पाच क्रमांक खालीलप्रमाणे
सायन्स शाखा : -
१ ) कु . फुंदे वैष्णवी शंकर ५९८ गुण ( ९२ % )
२ ) कु . रावळ प्रार्थना दिनेश ५८४ गुण ( ८९ % )
३ ) कु .ढवळे रविना धनाजी ५७५ गुण ( ८८ .४६ % )
४ ) कु . शहा मैथिली प्रितम ५७० गुण (८७ .६९ % )
५ ) कु . मोरे गायत्री हरिदास ५६९ गुण ( ८७ .५४ % )
कला शाखा :
१ ) कु . घोगरे साक्षी आण्णासाहेब ५५८ गुण ( ८५ .८४ % )
१ ) कु . पवार प्रिया महादेव ५५ ८ गुण ( ८५ .८४ % ) विभागुण
२ ) कु .झेंडे गोरी समाधान ५५२ गुण ( ८४ .९२ % )
३ ) कु . बंडलकर सुजाता युवराज ५४० गुण ( ८३ .o७ % )
४ ) डोके आनंद बाबुराव ५३४ गुण ( ८२ .१५ % )
५ ) कु . मोरे पूजा दत्तात्रय ५३० गुण ( ८१.५४% )
दोन्ही शाखेतील विषय निहाय उच्चतम गुण : -
क्रॉप सायन्स -१९८  , कंम्पुटर सायन्स =१८१ , गणित -९८ जीवशास्त्र ९७ , राज्यशास्त्र -९७ , भूगोल -९४ , मराठी -९३ ,हिंदी -९३  भौतिकशास्त्र -९३ , इतिहास- ८९ , रसायनशास्त्र -८६ , इंग्रजी -८३ ,
 यशस्वी व प्रावीण्य प्राप्त विद्यार्थांचे माढा तालुक्याचे आमदार मा . श्री . बबनरावजी शिंदे तसेच संस्चेचे अध्यक्ष तथा करमाळा विधानसभेचे आमदार मा . श्री . संजय मामा विठ्ठलरावजी शिंदे तसेच संस्थेचे सचिव तथा प्राचार्य मा . श्री . राजेंद्र ठोंबरे सर , अंबाड येथील प्रशालेचे प्राचार्य मा . जवानसिंग रजपूत सर , विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे संचालक मा . बबनबापू पाटील तसेच प्रशालेतील सर्व शिक्षक -शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी वृंद व अकोले ( खुर्द ) ग्रामस्थ यांनी अभिनंदन करून पुढील शैक्षणिक वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या . अकोले ( खुर्द ) व पंचक्रोशीतून विद्यालयाच्या निकालाबाबत कौतूक होत आहे .

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा