Breaking

शनिवार, ४ जुलै, २०२०

भोसरेच्या "कोरोनो पाॅझीटीव्ह" रुग्णाने उडविली कुर्डुवाडीकरांची झोप...




*अरुण कोरे कुर्डूवाडी* यासकडून 

------------------------------------------ 
   कुर्डूवाडी दि. 03/07/2020
*भोसरे (ता.माढा) येथील रहिवासी कुर्डुवाडीतील उपचारानंतर बार्शी येथील खाजगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल केल्यावर त्याचा रिपोर्ट कोरोनो पाॅझीटीव्ह आल्याने कुर्डुवाडीत एकच खळबळ उडाली आहे.*
       *सविस्तर वृत असे की,भोसरे येथील साठ वर्षीय नागरिकांस त्रास होऊ लागल्याने त्याने कुर्डुवाडीच्या माढा रोडवरील दोन खाजगी रुग्णालयात ओ.पी.डी. उपचार घेतले होते.त्यानंतर त्याचा त्रास वाढल्याने त्यास कुर्डुवाडी शहरातील टेंभुर्णी रोडवरील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी रविवारी दाखल करण्यात आले होते.*
        *त्याचा त्रास वाढल्याने सोमवार नंतर त्यास पुढील उपचारासाठी बार्शीच्या खाजगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले होते.परवा त्याचा स्वॅब घेतल्यानंतर काल रात्री उशिरा त्याचा रिपोर्ट कोरोनो पाॅझीटीव्ह आल्याने कुर्डुवाडीत एकच घबराट निर्माण झाली.*
         *परांडा चौक येथील भाग सिल करण्याचे काम सुरू झाले.परिसरातील अर्धा कि.मी.परिसर कंटोन्मेंट झोन व एक कि.मी.परिसर बफर झोन घोषित करण्यात आला आहे.*
           *या प्रकरणानंतर प्रांत अधिकारी ज्योती कदम मॅडम यांनी खबरदारीचा उपाय म्हणून सर्व विभागांच्या अधिका-यांची तातडीची बैठक घेऊन योग्य त्या सूचना देऊन योग्य ते आदेश दिले आहेत.*
         *या बैठकीला तहसीलदार राजेश चव्हाण, मुख्याधिकारी कैलास गावडे,बि.डी.ओ.संताजी पाटील, ग्रामीण रुग्णालय अधिक्षक डॉ.संतोष अडगळे आदी उपस्थित होते.*
          *रुग्णांच्या संपर्कातील लोकांची माहिती घेण्याचे काम सुरू आहे.*
         *टेंभुर्णी रोडवरील खाजगी रुग्णालयातील ज्या वार्डात रुग्ण अॅडमिट होता त्या वार्डाचा परिसर स्वच्छ व निर्जंतुक करण्यासाठी "सिल" करण्यात आला आहे.*
          *या रुग्णालयातील डॉक्टरांना चौदा दिवस होम काॅरंटाईन तर तेथील स्टाफपैकी पाच जणांना चौदा दिवस ईन्स्टीट्युशनल काॅरंटाईन करण्यात आल्याचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.संतोष अडगळे यांनी सांगितले.*
            *संपर्कातील सर्वांचे स्वॅब घेण्यात येणार असल्याचेही सांगण्यात आले.*
        *माढा तालुक्यात भोसरेसह, रिधोरे (६०वर्षे),आकुंभे (४८ वर्षे) असे तीन रुग्ण सापडले असल्याने आरोग्य खात्यावरील ताण वाढला असून तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.पलंगे यांनी सर्व ठिकाणी भेटी देऊन रुग्णांच्या संपर्कातील लोकांची माहिती घेण्याचे काम सुरू केले आहे.*
        *दरम्यान "काॅरंटाईन प्रकरणी" तालुक्यात घडणाऱ्या घटनांबाबत आरोग्य खात्याच्या भुमिकेबाबत कुर्डुवाडीच्या वैद्यकीय क्षेत्रातच दिवसभर उलट सुलट चर्चेला उधाण आले होते.*
         *पोलीस उपअधीक्षक विशाल हिरे यांनीही करमाळा व माढा तालुक्यातील कोरोनो पाॅझीटीव्ह रुग्णांच्या प्रत्येक ठिकाणी भेटी देऊन योग्य त्या खबरदारीच्या सुचना केल्या.व गलथाण कारभाराबाबत योग्य ती दखल घेऊन तातडीने मेहनत घेऊन युध्दपातळीवर आपली चोख कामगिरी बजावल्याने सर्वत्र त्यांच्या कामाबाबत विशेष कौतुक केले जात आहे.*
        *माढा तालुक्यातील वाढत्या रुग्णांचा सर्वच क्षेत्रात चांगलाच धसका घेतला असून नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.*
         *खबरदारीचा उपाय म्हणून कुर्डुवाडी शहरातील सर्वांचीच मते आजमावून "जनता कर्फूचा" निर्णय घेण्यात येणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले*