Breaking

बुधवार, ८ जुलै, २०२०

टेंभुर्णी येथील डॉक्टर असोसिएशनच्या वतीने "डॉक्टर्स डे"











------------------------------------------ 
टेंभुर्णी [प्रतिनिधी ] टेंभुर्णी येथिल डाॕक्टर असोसिएशनच्या वतीने 'डाॕक्टर्सडे"च्या निमित्ताने पर्यावरणाचा झालेला ऱ्हास भरून काढण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आवारात वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेण्यात आला.
      यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.अमोल माने, गटविकास अधिकारी डॉ.संताजी पाटील व टेंभुर्णी डॉक्टर्स असोसिएशनचे अध्यक्ष अंकुश लोंढे यांच्या उपस्थितीत पो.नि. श्री. राजकुमार केंद्रे साहेब यांनी दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात केली.
     यावेळी चिंच ,लिंब , नारळ, आंबा,  चिकू, सिताफळ,अशोका, बेहडा, हिरडा, पिंपरन आधी आयुर्वेदिक वनस्पतींचे वृक्षारोपण करण्यात आले..
  डॉ. संताजी पाटील यांनी मार्गदर्शन करत दहा हजार झाडे  लावण्याचा संकल्प केला.यावेळी डॉ पांडुरंग गायकवाड, डॉ.विनायक गंभीरे, डॉ.सचिन ढवळे, डॉ.अण्णासाहेब पवार, डॉ.गणेश डोईफोडे, डॉ.धनाजी खताळ, डॉ.मुकेश मस्तुद, डॉ.सतीश वाघावकर, डॉ.बालाजी साखरे, डॉ.दादासाहेब माने, डॉ.मदन कांबळे, डॉ.संजय दोशी, डॉ.सतिश साळुंके, डॉ.प्रवीण साखरे, डॉ.संदीप काळे, डॉ.संदीप उबाळे, डॉ.उमेश झाडबुके , डॉ लालासाहेब शेंडगे, डॉ.अमोल भोसले, डॉ.राहुल पाटील, डॉ.प्रशांत पाटील, डॉ.विशाल जाधव  उपस्थित होते