Breaking

गुरुवार, ३० जुलै, २०२०

*टेंभुर्णी रयत शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कुलचा अनिकेत देशमुख तिन्ही केंद्रात सर्व प्रथम*


टेंभुर्णी[प्रतिनिधी ] येथील रयत शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कुलचा दहावीचा निकाल शंभर टक्के लागला असून अनिकेत विष्णू देशमुख याने ९६.८० टक्के गुण मिळवून तिन्ही केंद्रात  व स्कुलमध्ये प्रथम येण्याचा मान मिळविला आहे.





तर रोहित राजेश बागवाले याने ९६.६० टक्के,वैष्णवी शैलेश इंगळे हिने ९६.६० टक्के गुण मिळवून अनुक्रमे द्वितीय क्रमांक मिळविला तसेच विद्या बाबासो गाजरे ९५.८० टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक मिळविला.
या यशाबद्दल टेंभुर्णी येथिल रमेश येवले-पाटील परमेश्वर मामा देशमुख  मुख्याध्यापक डी.टी. गोंजारी,पर्यवेक्षक एम.एस.भुजबळ,स्कुल कमिटी सदस्य,शिक्षक एस.के.शिंदे,आर.ए.बरबडे,आर.टी. लष्कर,एस.बी.मिरगणे,एस.जी.बोराडे,ए.बी.सुतार,जी.एन.अवघडे,के.एस.गायकवाड,एम.आय.पवार यांनी अभिनंदन केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा