Breaking

गुरुवार, ३० जुलै, २०२०

*कर्मयोगी कारखान्याचा मिल रोलर पुजन कार्यक्रम संपन्न*


*कर्मयोगी कारखान्याचा मिल रोलर पुजन कार्यक्रम संपन्न*”
------------------------------------------ 


aj24taas news 
इंदापुर /प्रतिनिधी शिवाजी पवार 

 इंदापूर [प्रतिनिधी ] गुरुवार दि. 30 जूलै रोजी – कर्मयोगी शंकररावजी पाटील सहकारी साखर कारखान्याने गाळप हंगाम २०२०-२१ ची तयारी जोरदारपणे सुरु केलेली असून त्या अनुषंगाने आज कारखान्याचे मिल रोलर पुजन कार्यक्रम कारखान्याचे अध्यक्ष व राज्याचे माजी सहकार व संसदीय कार्यमंञी  हर्षवर्धन पाटीलसाहेब तसेच कारखान्याच्या उपाध्यक्षा श्रीमती पद्माताई भोसले यांचे शुभहस्ते तसेच मा. संचालक मंडळाच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाला.

गाळप हंगाम वेळेत चालू होणेकरिता गाळप क्षमतेप्रमाणे ऊस तोडणी वाहतुकीसाठीचे ट्रक-ट्रॅक्टरचे आवश्यक असलेले करार कारखान्याने पूर्ण करणेत आलेची माहिती कारखान्याचे अध्यक्ष व राज्याचे माजी सहकार व संसदीय कार्यमंञी मा.श्री. हर्षवर्धनजी पाटीलसाहेब तसेच कारखान्याच्या उपाध्यक्षा श्रीमती पद्माताई भोसले यांनी दिली.

     कर्मयोगी शंकररावजी पाटील सह. साखर कारखान्याने या गाळप हंगामामध्ये कार्यक्षेञामधील सभासदांच्या उपलब्ध ऊस क्षेञाची व शेतकी विभागाकडे नोंद झालेल्या ऊसक्षेञाची माहिती घेऊन १४ लाख मे.टन गाळपाचे उदिष्ठ ठरविलेले असून ऊसतोडणी व वाहतुक यंञणा उभारणीचे काम जोमाने सुरु आहे. त्यानुसार ट्रक व ट्रॅक्टरचे ५५० करार पूर्ण झालेले आहेत. तसेच बैलगाडी ७०० व ट्रॅक्टरगाडी ४०० करार करणेचे काम सुरु असून ऊस वाहतुक कंञाटदारांना कारखान्याचे धोरणानुसार अॅडव्हान्स वाटपाचे काम सुरू आहे. त्यास तोडणी मुकादमांचाही चांगला प्रतिसाद मिळत अाहे.

     येणा-या गाळप हंगामासाठी गरज पडलेस कारखाना कार्यस्थळावर उपस्थित झालेल्या यंञणेसाठी कोरोना रोगाच्या पार्श्वभूमीवर संपुर्ण यंञणेच्या आरोग्याची काळजी घेण्याच्या द्रुष्टीने कारखान्याच्या वतीने संपुर्ण खबरदारी घेणेत येईल असे कारखान्याचे कार्यकारी संचालक श्री. बाजीराव सुतार यांनी यावेळी सांगितले.

     या कार्यक्रमास कारखान्याचे संचालक भरत शहा, यशवंत वाघ, राजेंद्र गायकवाड, राजेंद्र चोरमले, भास्कर गुरगुडे,  सुभाष काळे,  प्रशांत सुर्यवंशी,  मानसिंग जगताप, मच्छिंद्र अभंग, विष्णू मोरे, अंबादास शिंगाडे,  केशव दुर्गे, श्री. अतुल व्यवहारे,. वसंत मोहोळकर, सुभाष भोसले,  पांडुरंग गलांडे, कार्यकारी संचालक ,.बाजीराव जी. सुतार, वर्क्स मॅनेजर , ए.सी. पोरे, चीफ केमिस्ट , यु.के. कांदे, तसेच मुख्य शेतकी अधिकारी , एस.जी.कदम व सर्व अधिकारी यावेळी उपस्थित होते.
-------------------------------------------

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा