Breaking

शनिवार, २५ जुलै, २०२०

*माढा तालुक्यात कोरोनोने ओलांडली शंभरी भिमानगर ,रिधोरे , येथे ही वाढ*


*माढा तालुक्यात कोरोनोने ओलांडली शंभरी
भिमानगर ,रिधोरे , येथे ही वाढ*


  *कुर्डुवाडीत वैद्यकीय,आरोग्य राजकारण्यांच्या झाकाझाकीत शहरवाशीय वेठीस...*

------------------------------------------ 
   *संपर्कातील सर्वांनीच काॅरंटाईन व्हावे.. नागरिकांची मागणी...*
------------------------------------------ 
 
*aj24taas news*
*अरुण कोरे(पत्रकार)*


     *कुर्डुवाडी[ प्रतिनिधी ] शहरांत जनता कर्फूच्या काळात गुरुवारी आणखी दोन राजकीय क्षेत्रातील व  भिमानगर ,रिधोरे  सह वाढ
 रुग्ण पाॅझीटीव्ह आढळल्याने पुनः चिंता वाढली आहे.*

      *माढा रोडवर ग्रामीण रुग्णालयाचे समोर एका राजकीय व व्यापारी क्षेत्रांतील मान्यवराच्या पत्नींचा रिपोर्ट पाॅझीटीव्ह आलेने त्यांना बार्शी येथे खाजगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले आहे.*
    *तर न.पा.च्या नगरसेवकेच्या पतीला म्हसोबा गल्लीतील खाजगी रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर बार्शीला पाठविण्यात आले.तेथून पुन्हा त्यांना प्रकृतीत सुधारणा न झाल्याने सोलापूरला हलविण्यात आले आहे.*
   *एकूण फक्त ३६जणांचेच स्वॅब घेतल्याचे ग्रामीण रुग्णालयाचे वतीने सांगितले.किट संपल्याने तपासणीसाठी सोलापूरला पाठविण्यात आले आहेत.*
     *महिला रुग्णाची प्रकृती ठीकठाक असून सर्वांचे स्वॅब घेण्याबाबत त्यांच्या कुटुंबीयांच्या आग्रही भूमिकेबाबत विशेष कौतुक केले जात आहे.त्यांचा आॅक्सीजन आज ९७ टक्के आला आहे.*
     *मात्र न.पा.मध्ये जनता कर्फूच्या पार्श्र्वभूमीवर झालेल्या बैठकांना पतीदेवाची हजेरी व त्यांचा दांडगा संपर्क बरेच काही सांगून जातो आहे.*
     *याबाबत आरोग्य,वैद्यकीय व राजकारणी व्यक्तींशी संपर्क साधला असता गोलमाल उत्तरे दिली जात असल्याने नागरिकांतही उलट सुलट चर्चाना ऊत आला आहे.*
     *आरोग्य खात्याचे ऐन आणिबाणीच्या काळात किट उपलब्ध नसणे, उपचाराची असुविधा, टेस्ट घेणारांचे मतभेद वैद्यकीय अधिकाऱ्यांची गैरहजेरी आदी त्रुटींमुळे नागरिकांची होणारी हेळसांड यामुळे कुर्डुवाडीत कोविड रुग्णालयाची तातडीने उभारणी करावी किंवा रिकाम्या ग्रामीण रुग्णालयात सर्व सुविधा कराव्यात अशी मागणी जनतेच्या वतीने केली जात आहे.*
    *एवढेच नव्हे तर बार्शीच्या नावाजलेल्या रुग्णालयाचे प्रमुखांनीही कुर्डुवाडीकरांच्या हितासाठी गरज बोलून दाखवली.*
  *दोन्ही ठिकाणी न.पा.चे आरोग्य निरीक्षक तुकाराम पायगण त्यांच्या पथकाने कंटोन्मेंट झोन सिल केला आहे.*

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा