Breaking

शनिवार, २५ जुलै, २०२०

*रोहित दादा पवार फाऊंडेशन इंदापुर तालुकाध्यक्ष पदी नागेश गायकवाड यांची निवड.*



*रोहित दादा पवार फाऊंडेशन इंदापुर तालुकाध्यक्ष पदी नागेश गायकवाड यांची  निवड.* 

aj24taas news 
इंदापूर प्रतिनिधी  शिवाजी पवार



नागेश गायकवाड 

 रोहित दादा पवार फाऊंडेशनच्या इंदापुर तालुका अध्यक्ष पदी श्री. नागेश गायकवाड यांची निवड करण्यात आली. प्रदेश अध्यक्ष श्री. नामदेव खरात यांनी गायकवाड  यांना निवडीचे पत्र दिलेे.     
आमदार रोहीत दादा पवार फाऊंडेशनच्या माध्यमातून सामाजिक व लोक उपयोगी कामे करण्यासाठी तसेच फाऊंडेशनची ध्येय, धोरणे सामान्य व्यक्ती पर्यंत पोहचवण्यासाठी कार्यकर्तेची निवड केली जात आहे. त्यानूसार  बावडा ता. इंदापूर येथील सामाजिक कार्यकर्ते  व इंदापूर तालुका युवक रा. काॅंग्रेसच्या सरचिटणीस पदी पाच वर्षे सर्व सामान्यांचे कामे हिरीरीने केली. व पक्ष वाढीसाठी मोठे योगदान दिलेमुळे श्री.नागेश गायकवाड यांची निवड करण्यात आली आहे.     
 आमदार रोहीत दादा पवार यांनी जी माझ्यावर जबाबदारी दिली आहे. त्या जबाबदारीस पात्र राहून सर्वसामान्यांचे प्रन्श सोडवण्यास कटीबध्द असुन इंदापुर तालुक्यात मा. अमदार रोहीतदादा पवार व प्रदेश अध्यक्ष श्री. नामदेव खरात यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण तालुक्यात फाऊंडेशनच्या माध्यमातुन सर्वसामान्यांची सर्व कामे करुन तालुक्यात फाऊंडेशनच्या शाखा  उभा करु असे प्रतिपादन श्री. नागेश गायकवाड यांनी निवडी प्रसंगी बोलताना सांगितले. 


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा