*तात्यासाहेब कारंडे यांच्या वाढदिवसा निमित्त रक्तदान शिबिरात १०८ जणांचे रक्तदान*
टेंभुर्णी : कोरोनामुळे निर्माण झालेली राज्यासमोरील रक्त संकटात सहभाग नोंदविण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी रक्त दान करण्याचे आवाहन केल्यानंतर तात्यासाहेब कारंडे यांच्या वाढदिवसानिमित्त टेंभुर्णी येथील तात्यासाहेब कारंडे युवा प्रतिष्ठान टेंभुर्णी यांच्या सहकार्याने जि.प्र. शाळा येथे ३० जुलै रोजी सकाळी १० ते ५ या वेळेस रक्तदान शिबिर आयोजित केले होते. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सुरक्षित अंतर आणि मास्कचा वापर करण्याची खबरदारी घेतली जात होती. या रक्तदान शिबीरात १०८ इतक्या रक्तदात्यांनी सक्रीय सहभाग घेवुन रक्तदान केल्याचे दिसुन आले.
या रक्तदान शिबीरात रक्त संकलनासाठी सांगोला येथील रेवनील ब्लड बँक या रक्तपेढी चा सहभाग झाला होता. या रक्तदान शिबीरात रक्तदान करणाऱ्या सर्व रक्तदात्यांना सुरज शिंदे व भैय्यासाहेब कारंडे यांच्या हस्ते पाण्याचे जार आणि प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले.
यावेळी भैय्यासाहेब कारंडे, विजय साळवे, सुरज शिंदे, गणेश खरे, आकाश शिंदे, समाधान कांबळे, विनोद भोसले, चैतन्य कांबळे, महेश खरे, अजय ओहळ, यांच्यासह अनेक युवक मोठया संख्येने उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा